29 October 2020

News Flash

कॅलिफोर्नियाने केला सुशांतचा मरणोत्तर सन्मान; बहिणीने स्वीकारला पुरस्कार

सुशांत सिंह राजपूतच्या कर्तुत्वाला कॅलिफोर्नियाचा सलाम; पुरस्कार देऊन केलं कौतुक

आज १५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन. आज देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या मंगलमय दिवसाचं निमित्त साधून कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला सन्मानित केलं आहे. सुशांतने सामाजिक कामांमध्ये दिलेल्या योगदानाचं कौतुक अमेरिकेतील कॅलिफोर्नियाने देखील केलं आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने सुशांत तर्फे सन्मान स्विकारला आहे.

किर्तीने एक ट्विट करुन या सन्मानाबाबत सुशांतच्या चाहत्यांना माहिती दिली. “भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाने माझा भाऊ सुशांत सिंह राजपूतचा सन्मान केला आहे. कॅलिफोर्निया आमच्यासोबत आहे. तुम्ही आमच्यासोबत आहात का? कॅलिफोर्निया आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. #GlobalPrayersForSSR #Warriors4SSR #CBIForSSR #Godiswithus” अशा आशयाचं ट्विट किर्तीने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रिया आणि AU मध्ये ६३ फोन कॉल्स झाले. AU ही रियाची फॅमेली फ्रेंड असून तिचं नाव अनन्या उधास आहे. परंतु, रिया आणि अनन्यामध्ये इतक्या वेळा फोन का झाले हे अद्याप स्पष्ट न झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रियाचे फोन कॉल्स रेकॉर्ड तपासल्यावर तिने महेश भट्ट यांनीदेखील फोन केले होते. तसंच तिने वडिलांना सर्वाधिक फोन केल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 2:19 pm

Web Title: california state assembly recognises sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 “चीनमधून आयात न थांबवता आपण आत्मनिर्भर कसं होणार?”
2 लोकशाही त्यालाच म्हणणार ना?; दिग्दर्शक समीर विद्वांस यांचा स्वातंत्र्यदिनी सवाल
3 मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढून दे म्हणणाऱ्याला सोनू सूदचे भन्नाट उत्तर
Just Now!
X