News Flash

ईदला होणार सलमान-अक्षयमध्ये टक्कर?

हे दोन्ही चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

बॉलिवूडमध्ये येत्या आगामी काळात अनेक मोठमोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात अक्षयचा ‘सुर्यवंशी’ आणि सलमानच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटाचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहेत. मात्र आता हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून सलमान आणि अक्षयमध्ये टक्कर पहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

सलमानचे चित्रपट हे ईदला प्रदर्शित होतात त्यामुळे ‘ईन्शाल्ला’ हा २०२०मध्ये ईदला प्रदर्शित होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अक्षयचा ‘सुर्यवंशी’देखील ईदलाच प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं गेल्यावर्षी त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. रोहित शेट्टीसोबत अक्षय पहिल्यांदाच काम करत आहे त्यामुळे सूर्यवंशी चित्रपटाबद्दल अक्षयच्या चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. रोहितनं सलमानशी बोलूनच ईदला चित्रपट प्रदर्शित करण्याचं पक्क केलं होतं. मात्र आता या दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर पहायला मिळणार असंच दिसतंय.

नुकतीच दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी सलमान सोबतच्या चित्रपटाची घोषणा केली. यावेळी ‘मी आधी दबंग ३ चित्रपट पूर्ण करणार. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल आणि नंतर मी संजय लीला भन्साळींसोबत काम करायला सुरूवात करेन. हा चित्रपट ईद २०२० मध्ये प्रदर्शित होईल’, असं सलमाननं सांगितलं. त्यामुळे आता २०२० मध्ये ईदला हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार का हे पाहण्यासारखं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:09 pm

Web Title: date clash between salman khans inshallah and akshay kumars sooryavanshi
Next Stories
1 Photos : ‘तुला पाहते रे’ मालिकेतील कलाकारांची धुळवड
2 बॉलिवूड कलाकारांनी अशा दिल्या होळीच्या शुभेच्छा
3 समलैंगिक संबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘३७७ अब नॉर्मल’ चित्रपटाची नेटकऱ्यांकडून प्रशंसा
Just Now!
X