25 February 2021

News Flash

लगीनघाई… ‘या’ विधीपासून ‘दीप-वीर’ उचलणार सहजीवनाचं पहिलं पाऊल

काही दिवसापूर्वीच दागिन्यांची खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

रणवीर सिंह,दीपिका पदुकोण

बॉलिवूड विश्वामध्ये चित्रपटांबरोबरच कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही रोज नवनवी चर्चा रंगत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून बी टाऊनमध्ये दीपिका-रणवीरच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. या चर्चांबरोबरच दीपिका -रणवीरने लग्नाच्या खरेदीला सुरुवात केली असून दीपिकाने काही दिवसापूर्वीच दागिन्यांची खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

दीपिका आणि रणवीर लवकरच लग्नबेडीमध्ये बांधले जाणार असून त्याच्या घरातलेही लग्नाच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत. दीपिका-रणवीरने घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांच्या घरातले प्रचंड खुश आहे. त्यामुळे त्यांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली आहे. काही दिवसापूर्वी दागिन्यांची खरेदी करणारी दीपिका लग्नामध्ये सब्यासाची या डिझायनरने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  दीपिका-रणवीर जरी लग्नाच्या खरेदीमध्ये दंग झाले असले तरी त्यांच्या घरातले रितीरिवाजांना प्राधान्य देताना दिसत आहेत.

सहजीवनाचा प्रवास सुरळीत पार पडावा यासाठी दीप-वीरच्या घरी परंपरेनुसार साखरपुड्यापूर्वी एक पूजा करण्यात येते. ही पूजा साखरपुड्यापूर्वी १० दिवस आधी केली जात असून नंदी पूजा असं या पुजेला म्हटलं जातं. ही पूजा प्रियांका आणि निक जोनास यांच्या साखरपुड्यापूर्वीदेखील करण्यात आली होती.

दरम्यान, या पुजेसाठी दीपिकाच्या आईने तयारी सुरु केली असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पूजा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे दीप-वीर २० नोव्हेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 12:43 pm

Web Title: deepika and ranveer grand pre wedding puja
Next Stories
1 BLOG: हरहुन्नरी अभिनयातला ‘विजय’ हरपला!
2 VIDEO : वडिलांच्या आठवणीने प्रियांका भावुक
3 मुलाचं लग्न पाहण्याची विजय चव्हाण यांची ही इच्छाही अपूर्णच
Just Now!
X