16 February 2019

News Flash

‘टी सीरिज’सोबत अक्षय पुन्हा कधीच काम करणार नाही?

'मोगुल' चित्रपटामुळे झाला वाद

अक्षय कुमार

कोणत्याही चित्रपटातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी खिलाडी कुमारच्या नावाची वर्णी लागल्यावर अनेकांना हेवा वाटतो. अक्षय ज्या ताकदीने एखादे पात्र साकारण्यासाठी मेहनत घेतो ते पाहता त्याची प्रशंसाही केली जाते. पण, चित्रपटाच्या बाबतीत सर्व काही ठरल्याप्रमाणेच होते असे नाही. दिग्दर्शकासोबत काही मतभेद झाल्याने अक्षयने त्याच्या आगामी ‘मोगुल’ या चित्रपटातून काढता पाय घेतला होता. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार अक्षयच्या याच निर्णयामुळे तो भविष्यात ‘टी सीरिज’च्या कोणत्याही प्रोजेक्टचा भाग होऊ शकणार नाही.

‘टी सीरिज’चे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातून खिलाडी कुमार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार होता. काही महिन्यांपूर्वी त्याने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअरही केला होता. अक्षयने चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये काही बदल सुचवत ठराविक गोष्टी पुन्हा लिहिण्यास सांगितले होते. पण, त्याच्या म्हणण्याकडे दिग्दर्शक सुभाष कपूरने पूर्णपणे दुर्लक्ष केले. दिग्दर्शकासोबत झालेल्या या मतभेदांमुळेच अखेर अक्षयने चित्रपटातून काढता पाय घेण्याचा पर्याय निवडल्याचं म्हटलं जात होतं.

Video: तारक मेहता आणि अॅव्हेंजर्सचा अफलातून ‘मॅश-अप’

सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षयच्या या निर्णयाने भूषण कुमार नाराज झाले असून दुसरा एखादा सुपरस्टार आपल्या वडिलांच्या भूमिकेसाठी निवडेन असे त्यांनी ठरवले आहे. तर दुसरीकडे अक्षयनेही चित्रपटासाठी सुरुवातीला मिळालेली रक्कम टी सीरिजला परत केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे टी सीरिज आणि अक्षय यांच्यातील नातेसंबंधात कडवटपणा आला असून आता भविष्यात तो टी सीरिजसोबत काम करण्याची शक्यता धूसर आहे.

First Published on March 27, 2018 11:53 am

Web Title: due to mogul controversy akshay kumar will never again work with t series