News Flash

दिग्दर्शक केदार शिंदे आणणार ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’चा पुढचा पार्ट?

केदार शिंदे यांनी पोस्ट केला एक खास प्रोमो

मराठीतल्या दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी नाटकं. हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या मालिका ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा सिनेमांचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.  त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे. ही मालिका लॉकडाउनच्या काळात पुन्हा एकदा सुरु करण्यात आली होती. मात्र या मालिकेचा पुढचा पार्ट केदार शिंदे घेऊन येणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे त्यांनी फेसबुकवर शेअर केलेला एक छोटासा व्हिडीओ.

केदार शिंदे यांनी शेअर केलेला व्हिडीओ

या व्हिडीओच्या पोस्टमध्ये त्यांनी केदार शिंदे यांनी काय म्हटलं आहे?

श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील पात्रांचा हा कार्टून प्रोमो आहे. त्याला ते टायटल म्युझिकही आहे. ज्यामुळे श्रीयुत गंगाधर टिपरेंच्या आठवणी ताज्या होतात.  यासोबतच केदार शिंदे म्हणतात, “हे प्रेम… लोकहो लवकरच नवं काहीतरी घेऊन येतोय. यासारखं काहीच होऊ शकत नाही. पण, अभिमानाने सांगू शकाल की मराठीत चांगलं पाहण्याची इच्छा पूर्ण झाली.”

श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यामधले शेखर, शामला, आबा, शलाका आणि शिरीष अर्थात शिऱ्या हे सगळ्यांच्या लक्षात आहेत. ही मालिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. आता याच मालिकेचा पुढचा पार्ट केदार शिंदे आणतील का? तर याचं उत्तर सध्या तरी मिळायचं आहे. पण त्यांनी म्हटलंय की यासारखं काहीच होऊ शकत नाही.. त्यामुळे कदाचित टिपरेचा पुढचा भाग केदार शिंदे आणतील असं वाटतं आहे. समजा तसं झालं नाहीच तरीही केदार शिंदे कोणती नवी मालिका घेऊन भेटीला येणार याची उत्सुकात शिगेला पोहचली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 4:32 pm

Web Title: famous marathi director kedar shinde announces new serial with his special post scj 81
Next Stories
1 फ्लॅटच्या EMI बद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर अंकिता प्रियकर विकीबद्दल म्हणाली, ‘तूच माझा…’
2 निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर; रुग्णालयाची माहिती
3 सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा भावूक; शेअर केली ‘ही’ खास पोस्ट
Just Now!
X