करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण असून हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान करोनासारखा कुठलाच आजर अस्तित्वात नाही असं म्हणत डॉक्टरांची खिल्ली उडवणाऱ्या सोशल मीडिया स्टार दिमीत्री स्तुहूक याचा करोनामुळेच मृत्यू झाला आहे. तो ३३ वर्षांचा होता. टर्कीमध्ये फिरण्यासाठी गेला असताना त्याला करोनाची लागण झाली. टर्कीमधील नामांकित रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

दिमीत्री हा युक्रेनमधील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी जीम ट्रेनर होता. तो सोशल मीडियाद्वारे देखील लोकांना व्यायाम करायला शिकवायचा. अलिकडेच त्याने एका व्हिडीओद्वारे डॉक्टरांची खिल्ली उडवत करोना विषाणूवर प्रश्न उपस्थित केले होते. करोनासारखा कुठल्या आजार अस्तित्वातच नाही असा दावा त्याने केला होता. या व्हिडीओमुळे तो रातोरात संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे काही दिवसानंतर त्यालाच करोनाची लागण झाली. त्यानंतर अनेक दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्याचं शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं. अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

अवश्य पाहा – ‘बॉण्ड गर्ल’च्या पहिल्या बिकिनीचा होतोय लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क

महाराष्ट्रात आज अवघे ५ हजार ९८४ नवे करोना रुग्ण

महाराष्ट्रात आज अवघे ५ हजार ९८४ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर १५ हजार ६९ रुग्ण मागील २४ तासांमध्ये बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ नवे करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ८६.४८ टक्के एवढे झाले आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर २३ हजार २८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.