04 March 2021

News Flash

Video : विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत वरुण धवनचा ‘फर्स्ट क्लास’ डान्स

ब्रेकअपनंतर हरलीनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरलीन सेठी हे नाव सध्या अनेकांच्याच परिचयाचं झालं आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपट फेम अभिनेता विकी कौशलची गर्लफ्रेंड म्हणून हे नाव सर्वाधिक चर्चेत होतं. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही बातम्या होत्या. ब्रेकअपनंतर हरलीनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ‘फर्स्ट क्लास’ या गाण्यावर हरलीन आणि वरुण डान्स करताना दिसत आहेत. हरलीननं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

धर्मा प्रॉडक्शनचा बहुचर्चित ‘कलंक’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी त्याआधी चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत. वरुणच्या ‘फर्स्ट क्लास’ या गाण्याला प्रेक्षकांचा चांहला प्रतिसाद मिळत आहे. अरिजीत सिंगने गायलेल्या या गाण्याने तरुणाईवर जादूच केली आहे. कोरिओग्राफर मेलवीन लुईससुद्धा हरलीनच्या व्हिडिओत दिसत आहे. यातील हरलीन आणि वरुणची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरली आहे.

वरुण धवनच्या ‘कलंक’ चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. वरुणसोबतच आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय दत्त आणि माधुरी तब्बल १२ वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 1:07 pm

Web Title: harleen sethi grooves with varun dhawan on first class post breakup with vicky kaushal watch video
Next Stories
1 ‘मोदींच्या बायोपिकला झुकतं माप’, प्रसून जोशींच्या राजीनाम्याची मनसेची मागणी
2 शाहिद म्हणतोय, ‘तुमच्यातील कबीर सिंगला ओळखा’
3 विवेक ओबेरॉय या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक
Just Now!
X