बॉलिवूडची धक धक गर्ल असलेल्या माधुरी दीक्षितचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या अदांनी आणि हास्याने आजवर अनेकांना घायाळ केले आहे. यात सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटींचाही समावेश होतो. बॉलिवूडच्या या धकधक गर्लला पाहण्यासाठी आजही चाहत्यांची झुंबड उडते. आज १५ मे रोजी माधुरीचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया माधुरी विषयी काही खास गोष्टी…

माधुरीचे चाहते ती ऑनस्क्रीन आल्यावर तिला पाहतच राहायचे. तुम्हाला माहितीये का, एकेकाळी सुरेश वाडकर यांना माधुरीचे स्थळ आले होते. पण, सुरेश वाडकरांनी चक्क माधुरीच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावला होता.

आणखी वाचा : झोपेतून उठताच उर्मिलाला समोर पाहिले अन्…; आदिनाथ-उर्मिलाची लव्हस्टोरी

आणखी वाचा : म्हणून पहिल्याच चित्रपटातून सैफला दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता

माधुरीचं घर पारंपरिक विचारांच असल्यामुळे त्यांना माधुरीने चित्रपटांमध्ये काम करणे पसंत नव्हते. तिने फक्त घर-संसार सांभाळावा या विचारांचे ते होते. त्यामुळेच खूप आधीपासून तिचे वडील तिच्यासाठी स्थळं शोधत होते. वराच्या शोधात माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे तिचं स्थळ घेऊन गेले. त्यावेळी वाडकरांनी संगीत क्षेत्रात स्वतःचं करिअर करण्यास सुरुवात केली होती. माधुरीच्या आणि वाडकर यांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता. त्यावेळी वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव मुलगी खूपच बारीक असल्याचे कारण देत फेटाळला होता. त्यामुळे माधुरीचे वडील निराश होऊन घरी परतले. पण, त्यावेळी मिळालेल्या एक नकारामुळे माधुरीचं ग्लॅमरस करियर घडलं आणि ती मोठी स्टार बनली. पुढे अनेकदा माधुरीच्या चित्रपटांसाठी सुरेश वाडकरांनी पार्श्वगायनही केलं.

या सर्व घटनेनंतर माधुरीने १९८४मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून पुन्हा पदार्पण केले. १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीने लग्न करून परदेशात संसार थाटला. माधुरीला दोन मुलगे असून, ती संसारात रमली आहे.