‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. विविध फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. हिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तिचे वडील तिच्याशी बोलताना दिसत आहेत. हिनाचे सर्व क्रेडिट व डेबिट कार्ड तिच्या वडिलांनी ब्लॉक केले असून व्हिडीओ हिना त्यांना जाब विचारताना दिसतेय.

तुम्ही माझे सर्व कार्ड ब्लॉक का केले, असा चिडून सवाल हिना तिच्या वडिलांना विचारते. त्यावर ते शांतपणे तिला उत्तर देतात की, लॉकडाउन अजूनही सुरू आहे, त्यामुळे पैशांची बचत करणं गरजेचं आहे. सर्व कार्ड ब्लॉक केल्यावर मी शॉपिंग कशी करू आणि मला कॉफी प्यायचं असेल तर काय करू असं हिना पुढे त्यांना विचारते. “मी तुला कॉफीसाठी २०० रुपये देईन, तू माझ्याकडून कॅश घेऊ शकतेस”, असं ते तिला म्हणतात. माझे सर्व कार्ड्स परत द्या अशी विनंती हिना त्यांना करत असते, मात्र ते तिचं ऐकत नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan) on

आणखी वाचा : ‘मिर्झापूर २’मधून हटवला जाणार ‘तो’ वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी

हिनाच्या वडिलांनी असं का केलं आणि खरंच त्यांनी तिचे सर्व कार्ड्स ब्लॉक केले की त्यांनी तिची गंमत केली हे मात्र हिनाच सांगू शकेल. मात्र या व्हिडीओमुळे हिनाच्या चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.