News Flash

कंगना रणौत संतापली; टीका करणाऱ्या अभिनेत्रीला ट्विटरवर केलं ब्लॉक

"इतकं मनाला लावून घेऊ नकोस"; अभिनेत्रीने पुन्हा एकदा कंगना रणौतला डिवचलं

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. अनेकदा या बिनधास्त प्रतिक्रियांमुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. अलिकडेच ट्विटरवर ‘सस्पेंड टीम कंगना’ हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. या हॅशटॅगला पाठिंबा देत अभिनेत्री कुब्रा सैत हिने कंगनावर निशाणा साधला. मात्र यामुळे संतापलेल्या कंगनाने कुब्राला ट्विटरवर ब्लॉक केलं. या ट्विटर वॉरमधील लक्षवेधी बाब म्हणजे ब्लॉक केल्यानंतरही कुब्रा शांत बसलेली नाही. मला ब्लॉक का केलंस? असा सवाल करत तिने कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून नावारुपास आलेल्या कुब्रा सैतने पुन्हा एकदा कंगनाशी पंगा घेतला आहे. “अय्यो, गेल्या अनेक दिवसांपासून मी शांत आहे. तुझ्या विरोधात मी एकही ट्विट केलेलं नाही. तरी देखील न सांगता तू माझ्याशी कट्टी घेतलीस. इतकं मनाला लावून घेऊ नकोस.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने पुन्हा एकदा कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी काय म्हणाली होती कुब्रा?

“#सस्पेंड टीम कंगना या हॅशटॅगचं मी समर्थन करते. ट्विटरने या ट्रेंडकडे लक्ष द्यावं. आजचा दिवस सोडला तर या अकाउंटवरुन कधीही सकारात्मक ट्विट केलं गेलेलं नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कुब्राने कंगनावर निशाणा साधला होता. तिच्या या ट्विटवर कंगनाच्या टीमने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. “प्रिय कुब्रा सैत, कंगनाने तुझं काय नुकसान केलं ज्यामुळे तू तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात आवाज उठवत आहेस. तूझी नेमकी समस्या काय आहे? तुला खरंच कंगनाविरोधात बोलायचंय की कोणाला तरी खुश करायचंय?” अशा आशयाचं ट्विट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 5:26 pm

Web Title: kangana ranaut blocks kubbra sait on twitter mppg 94
Next Stories
1 खोटं बोलणं थांबवा म्हणत शिल्पा शिंदेने शेअर केले स्क्रीनशॉट
2 “मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण…”; राष्ट्रवादीचा कंगनाला टोला
3 वाघिण मुंबईत येतेय दम असेल तर रोखून दाखवा, बबिता फोगाटचा कंगनाला पाठिंबा
Just Now!
X