News Flash

‘सामान्य दर्जाच्या अभिनयाचं कौतुक करणं थांबवा’, कंगनाचा आलियावर हल्लाबोल

आलिया भट्टशी कंगनाची तुलना केल्याने तिचा पारा चढला आहे.

कंगना रणौत, आलिया भट्ट

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत तिच्या परखड मतांमुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बी-टाऊनमधील कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीला खडेबोल सुनावण्यात कंगना कधीच मागे नसते. अभिनेत्री आलिया भट्टशी कंगनाची तुलना केल्याने तिचा पारा चढला आहे. या तुलनेवर उत्तर देताना कंगनाने आलियाच्या ‘गली बॉय’ चित्रपटातील अभिनयाला सामान्य दर्जाचा असल्याचं म्हटलं.

एका वेबसाइटने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पोल घेतला. या पोलमध्ये कंगनाला ३७ टक्के तर आलियाला ३३ टक्के मतं मिळाली. यावर कंगनाची प्रतिक्रिया विचारली ती म्हणाली, ‘मला खरंच लाज वाटतेय. ‘गली बॉय’च्या परफॉर्मन्समध्ये टक्कर देण्यासारखं आहे तरी काय? तीच फटकळ मुलगी.. बॉलिवूडच्या पठडीत बसणारी बिनधास्त तरुणी.. महिला सशक्तीकरण आणि उत्तम अभिनय.. कृपा करून मला या सगळ्यांपासून दूर ठेवा. प्रसारमाध्यमांनी या फिल्मी मुलांना खूप डोक्यावर उचलून घेतलंय. सुमार दर्जाच्या कामगिरीचं कौतुक करणं थांबवा, अन्यथा आपला दर्जाच कधी त्याहून वर नाही जाणार.’

झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ या चित्रपटातील अभिनयासाठी प्रेक्षकांनी आलियाची प्रशंसा केली होती. आलियाचं अभिनय कौशल्य आणि ती साकारत असलेल्या विविध भूमिका नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. मात्र कंगनाला तिचं अभिनय सुमार दर्जाचं वाटत आहे.

याआधीही कंगनाने आलिया, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्यावर बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. याउलट आलियाने कंगनाच्या या दृष्टीकोनाचं स्वागत केलं. तिची मतं वेगळी असू शकतात, असं आलिया म्हणाली. आता ‘गली बॉय’मधील अभिनयावरून टीका करणाऱ्या कंगनाला आलिया काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 3:18 pm

Web Title: kangana ranaut calls alia bhatt performance in gully boy mediocre
Next Stories
1 ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
2 ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3 मुन्नाभाईची भूमिका मी नाकारल्यानंतर संजय दत्तच्या पदरात पडली- विवेक ओबेरॉय
Just Now!
X