News Flash

‘कसौटी जिंदगी की २’मधून हिना खानची गच्छंती?

आता कोमोलिकाची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे

काही वर्षांपूर्वी आलेली ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: गाजली होती. या मालिकेतील प्रेरणा अनुरागच्या जोडीबरोबरच कोमोलिका ही खलनायिकाही लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. आता सुरु असलेल्या या मालिकेचा रिमेकदेखील प्रेक्षकांच्या मानवर राज्य करित आहे. पार्थ समथान, एरिका फर्नांडिस, हिना खान आणि करण सिंग ग्रोवरने अनुराग, प्रेरणा, कोमोलिका आणि मिस्टर बाजाजची भूमिका बजावत आहेत. मात्र हिना खान ऐवजी नवीन कोमोलिका झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

हिना खान तिच्या आगमी चित्रपटांच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे तिने मालिकेमधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे मालिका निर्माते हिनाच्या जागी दुसरा चेहरा कास्ट करणार आहेत. कोमोलिका या पात्रासाठी मधुरिमा तुली, रागिनी खन्ना, सनाया ईरानी, दिशा परमार आणि रिद्धि डोगरा यांची नावे समोर आली होती. एकता कपूरने सनाया ईरानीची या भूमिकेसाठी निवड केली होती. परंतु सनायाने ही भूमिका साकराण्यास नकार दिला. नुकताच हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये कोमोलिका या पात्रासाठी अभिनेत्री जॅस्मिन भसीनची निवड करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या भूमिकेसाठी जॅस्मिनशी बोलण्यात आले असल्याचे देखील म्हटले जात आहे.

जॅस्मिनने एका मुलाखतीमध्ये या भूमिकेचा खुलासा केला आहे. ‘या सर्व अफवा आहेत. मला आतापर्यंत बालाजीमधून फोन आलेला नाही. सध्या मी राजस्थानमध्ये चित्रीकरण करत आहे. मी कोमोलिकाची भूमिका साकारणार आहे हे देखील मला इतरांकडून कळाले आहे’ असा खुलासा जॅस्मिनने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 12:50 pm

Web Title: kasautii zindagii ki 2 tv actress hina khan is replace for komolika role avb 95
Next Stories
1 शैक्षणिक घोटाळ्याप्रकरणी शाहरुखच्या चौकशीचे आदेश
2 ‘मर्डर २’च्या अभिनेत्याला अटक; १.२० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
3 प्रियांका चोप्राने सांगितला स्ट्रगलिंगच्या काळातील धक्कादायक अनुभव
Just Now!
X