सध्या लॉकडाउनमुळे अनेकजण आपल्या घरात अडकले आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. पण सध्याच्या काळात हेच कलाकार सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे दिसत आहे. दररोज ते नवनवीन व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. आता या कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेत्री कृति खरबंदादेखील सामील झाली आहे.

नुकताच कृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोल डान्स करताना व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा जुना व्हिडीओ आहे. पण कृतीचा हा व्हिडीओ पाहून चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे. तसेच तिच्या या व्हिडीओवर अभिनेत्री क्रिती सेनॉनने कमेंट केली आहे.

कृती खरबंदाने हा व्हिडीओ शेअर करत ‘हे माझ्या आवडीचे काम आहे. माझ्या घरात मी पोल बसवला नसल्यामुळे मला वाईट वाटत आहे. तुमच्या टू डू यादीमध्ये काय काय सहभागी आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला करायला आवडते’ असे तिने कॅप्शन दिले आहे.

सध्या लॉकडाउनमध्ये कृती बॉयफ्रेंड पुलकित सम्राटसोबत राहत आहे. कृतीने आतापर्यंत ‘शादी मे जरुर आना’, ‘हाऊसफुल ४’ आणि ‘पागलपंती’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.