Lust Stories. काही दिवसांपूर्वी हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्या चर्चा थांबच नाहीत तोच ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजमधील हस्तमैथुनाच्या दृश्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. ज्यामुळे अभिनेत्री कियारा आडवाणीवर अनेकांनी निशाणा साधला. या सर्व चर्चा पाहता खुद्द कियारानेच हस्तमैथुनाच्या दृश्यावर आपलं मत मांडलं आहे.

‘लस्ट स्टोरीज’मधील करण जोहर दिग्दर्शित एका भागामध्ये कियाराने एका विवाहित महिलेची भूमिका साकारली आहे, ज्यामध्ये तिची कामुकता दाखवण्यात आली आहे. याच दृश्याविषयी होणाऱ्या चर्चा पाहता कियाराने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ‘माझ्या या सर्व (हस्तमैथुनाचं दृश्य वगैरे) गोष्टींविषयी कोणताच न्यूनगंड राहिलेला नाही. याविषयी खुलेपणाने बोललं जाऊ लागलं आहे. किंबहुना उगाचच त्या विषयी चर्चा का करावी, असंही अनेकांना वाटतं. मुळात या सर्व गोष्टी समाजात रुळायला काहीसा वेळ लागणार आहे. सर्वजणांना एकाच वेळी हे पटण्याजोगं असेलच असं नाही. उदाहरणार्थ चुंबनदृश्यांविषयीसुद्धा अनेक चर्चा झाल्याचं आपण पाहिलं आहे. पण, आता मात्र ती परिस्थिती राहिलेली नाही’, असं कियारा म्हणाली.

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

सर्व गोष्टी अगदी मुद्देसूद असून, त्याविषयी प्रत्येकालाच माहितीसुद्धा आहे. कोणत्याही गोष्टीचा इथे संदर्भ नाहीये, असं होत नाही. त्यामुळे गोष्टी बळजबरीने दडवून ठेवण्यापेक्षा त्या प्रभावीपणे सादर करणं कधीही उत्तम असतं. कारण, ‘लस्ट’ हासुद्धा प्रेमाचाच एक भाग आहे, असंही तिने स्पष्ट केलं.

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती

एक कलाकार म्हणून आपण स्क्रीप्टला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला असून, चित्रीकरणाऱ्या वेळीसुद्धा कोणालाच याविषयी संकोचलेपणा वाटला नव्हता, असं ती म्हणाली. जोया अख्तर, करण जोहर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकांनी चार स्त्रियांच्या कथा या वेब सीरिजमध्ये मांडल्या आहेत. १५ जून पासून नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.