मराठी चित्रपटसृष्टीतली अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी आज लग्नबंधनात अडकली. आज सोनालीचा ३३वा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी तिने कुणाल बेनोडकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने या लग्नसोहळ्याबद्दलच्या काही अनोख्या गोष्टीही सांगितल्या आहेत.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने लग्नातले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या या अनोख्या लग्नसोहळ्याबद्दलही सांगितलं आहे. ती म्हणते, “अब से हम ‘7’ ‘मे’. तर आम्ही जूनमध्ये यूकेला लग्न करणार होतो. पण तिथल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे तारीख पुढे करावी लागली, मग जुलैमधली तारीख ठरली.”

Nagpur, Surge in Road Accidents, 102 Dead 284 Injured, Nagpur accidents, nagpur surge accidents, accidents news, nagpur news, marathi news, traffic police, rto, accident in nagpur, nagpur accident,
नागपूर : तीन महिन्यांत रस्ते अपघातात १०२ जणांचा मृत्यू , शहरात ३११ अपघात…
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान

“कुणालबरोबर बसून लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शूटिंग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. आणि मी पुन्हा दुबईला अडकले. जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून एप्रिलमध्ये यूकेने भारतीयांच्या प्रवासावर बंदी आणली. क्वारंटाईन, प्रवासावरती बंदी, परिवाराला धोका, लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम, या सगळ्याचा विचार करुन आम्ही आमचा भला मोठा लग्न सोहळा रदद करण्याचा निर्णय घेतला. आता जुलैमध्ये लग्न करणार होतो पण मेमध्येच लग्न करुन आम्ही सगळ्यांना धक्का दिला आहे. ”

“आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलाही सोहळा करु शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही. आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही…आत्ताच शिक्का मोर्तब करुन टाकू. २ दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांत आणि चार लोकांच्या साक्षीने वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून( लग्नाच्या मान्यतेसाठी मंदिराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱे विधी) लग्नाच्या प्रमाणपत्रावर सही केली. ”

सोनालीच्या परिवाराने या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचंही तिने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे. तिच्या सर्व सहकलाकारांनी, मित्रमंडळींनी आणि, चाहत्यांनी तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.