बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत करत असलेला पहिला चित्रपट म्हणून मराठी चित्रपट ‘चुंबक’चा सध्या बोलबाला असून या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला.

चित्रपटाचे नायक मुंबईत भारतीय रिझर्व बँकेच्या कार्यालयाच्या बाहेर एका विचित्र परिस्थितीत कसे अडकतात त्याचे अधोरेखन या पोस्टरमध्ये आहे. ‘दुष्कृत्यांचा शहेनशाह’ असे ज्याला संबोधले जाते तो मोबाइल मॅकेनिक ‘डिस्को’, हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा पण ज्याला ‘गव्हर्नरचा असिस्टंट’ संबोधले जाते असा ‘बाळू’, गबाळा दिसणारा आणि दुष्कृत्यांना नाहक बळी पडणारा स्वानंद किरकिरे यांनी साकारलेला ‘प्रसन्ना’ हे या पोस्टरवर आहेत. पोस्टर मनाला भिडणारे आणि तेवढेच प्रभावी झाले आहे.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

संदीप मोदींनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा टीझरही प्रकाशित करण्यात आला. तोसुद्धा खिळवून ठेवणारा आहे. स्वानंद किरकिरेंचा प्रसन्ना, साहिल जाधवचा बाळू यांच्यातील बसमधून प्रवास करत असताना खिडकीजवळील जागा पटकावण्यासाठी झालेली ‘चकमक’ या टीझरमध्ये प्रभावीपणे दिसते.

बॉलीवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारने सामाजिक माध्यमांचा आधार घेत शुद्ध मराठीत एक घोषणा केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत हलचल माजली आहे. अक्षयने एक व्हिडीओ प्रकाशित करून ‘चुंबक’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाची प्रस्तुती तो स्वतः करत असल्याची घोषणा केली होती. चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया आणि नरेन कुमार करत असून कायरा कुमार क्रीएशन्स प्रोडक्शनचा चित्रपट आहे.

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती

दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या आणि आघाडीचे गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक आणि लेखक असलेल्या स्वानंद किरकिरे यांनी ही भूमिका साकारली आहे. सोलापूरमधील एका छोट्या गावातील सरळसाध्या अशा व्यक्तीची ही भूमिका आहे. स्वानंद अगदी पहिल्यांदाच चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारात आहेत. अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ २७ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.