News Flash

‘शाहिद खरा चॉकलेट बॉय नाही’; मीरा राजपूतचं अजब वक्तव्य

मीरा म्हणते, शाहिद कपूर चॉकलेट बॉय नाही, तर...

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. बॉलिवूडमध्ये सक्रीय असणारी ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे शाहिदपेक्षा मीरा इन्स्टाग्राम, फेसबुकवर जास्त अॅक्टीव्ह असून अनेक वेळा ती थ्रोबॅक फोटो किंवा तिच्या कुटुंबासमवेतचे फोटो शेअर करत असते. यात नुकताच तिने शाहिदचा एक जुना फोटो शेअर केला असून त्याला भन्नाट कॅप्शन दिली आहे.

कबीर सिंग या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळविलेला शाहिद आज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय या नावानेदेखील तो ओळखला जातो. मात्र शाहिद खरा चॉकलेट बॉय नाही, असं मीराने म्हटलं आहे. सोबतच तिने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही फोटो कोलाज करुन ते शेअर केले आहेत.

“शाहिद फक्त चॉकलेट बॉय नाही. जर तुम्हाला खरंच शाहिदचे थ्रोबॅक फोटो पाहायचे असतील तर कॉम्पॅनची जाहिरात पाहा. #complanboy #notachocolateboy”, असं कॅप्शन मीराने या फोटोला दिलं आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शाहिदने अनेक जाहिराती आणि म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. शाहिद आणि मीराने २०१५ मध्ये लग्न केलं असून त्यांन मिशा आणि झैन ही दोन मुलं आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 2:03 pm

Web Title: mira rajput shares shahid kapoor complan ad real throwback see pics ssj 93
Next Stories
1 ‘सर्किट’लाही वाढीव वीजबिलाचा शॉक! निवडला ‘हा’ मार्ग
2 बिग बींनी सांगितली ‘प्रतीक्षा’ बंगल्यातल्या ४३ वर्षे जुन्या गुलमोहर झाडाची गोष्ट
3 दोन दिवसापूर्वी सांगितलं असतं तर…; मदत मागणाऱ्या व्यक्तीला सोनू सूदचं उत्तर
Just Now!
X