बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या २८ ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र निवडणूकीला अवघा एक दिवस असतानाही राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरुच आहेत. परिणामी कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार? याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र या राजकीय तणावग्रस्त वातावरणात अभिनेता पंकज त्रिपाठी याने केलेलं ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमधील या कालिन भय्यानं “योग्य आणि प्रामाणिक उमेदवारालाच मतदान करा” अशी बिहारच्या नागरिकांना केली आहे. शिवाय आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्याने मतदानाचं महत्व देखील समजावून सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

सर्वाधिक वाचकपसंती – ‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…

बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.