दाक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता आणि चित्रपट निर्माता अक्कीनेनी नागार्जुन आता बॉलिवूड मधील चित्रपटामध्ये झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या बिग बजेट चित्रपटात नागार्जुन महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असून अमिताभ बच्चन देखील भूमिका वठवणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नागार्जुन ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे. तसेच जून महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला वाराणसीमध्ये सुरुवात झाल्याचे देखील म्हटले आहे. चित्रपटात नागार्जुन आणि अमिताभ यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

जवळपास २५ वर्षांपूर्वी नागार्जुनने ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘खुदा गवाह’, ‘क्रिमिनल’ आणि ‘जख्म’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘LOC कारगील’ या चित्रपटानंतर तो आता बऱ्याच वर्षांनी ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A very good morning from Tirumala!!blessed!! #Nagarjuna

A post shared by Nagarjuna (@akkineni__nagarjuna) on

गेल्या बऱ्याच वर्षांपासून नागार्जुनला हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. मात्र तो चांगल्या पटकथेच्या प्रतिक्षेत होता. अखेर ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने त्याला ही संधी मिळाली. विशेष म्हणजे बिग बीसुद्धा स्क्रिन शेअर करणार असल्याने नागार्जुनने निर्मात्यांना लगेच होकार कळवला होता.

 

View this post on Instagram

 

@aliaabhatt and #ranbirsingh at movie shooting of #bramastra

A post shared by Alia (@_aliabhatt__0) on

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी अयान मुखर्जीला तब्बल पाच वर्षांचा प्रदीर्घ कलावधी लागला होता. एकंदरीत चित्रपटाची तगडी स्टार कास्ट पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच आलिया आणि रणबीरची ऑन स्किन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.