‘कभी कभी लगता है अपुन ही भगवान है’ म्हणणारा गणेश गायतोंडे ‘सेर्केड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनमध्ये परत येतोय. ‘सेर्केड गेम्स’च्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला यातील नवाजच्या तोंडी असलेले डायलॉग्स तर खुपच गाजले. तेव्हा ‘सेर्केड गेम्स’मधल्या नवाजुद्दीनच्या भूमिकेला मिळालेली प्रसिद्धी पाहता त्यानं आपल्या मानधनात दुप्पट वाढ केल्याचं समजत आहे.

‘सेर्केड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीनं पहिल्या सिझनपेक्षा दुप्पट मानधन मागितलं आहे. त्यामुळे सैफला या वेबसिरिजसाठी जितकं मानधन देण्यात आलं तितकंच मानधन आता नवाजुद्दीन सिद्दीकीला देण्यात येणार आहे. मी जितकं मानधन मागतो तेवढं मानधन मोठे निर्माते द्यायला तयार होतात. माझी जेवढी पात्रता आहे तितकंच मानधन मी मागितलं आहे असं नवाजुद्दीन म्हणाला आहे.

आता ‘सेर्केड गेम्स’च्या यशानंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत नवाजुद्दीनच्या नावाचा समावेश झाला आहे. नुकताच नवाजुद्दीनची प्रमुख भूमिका असलेला ‘मंटो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला पुढील वर्षांत नवाजुद्दीनचा बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.