सतारवादक अनुष्का शंकर यांनी त्यांच्या ‘लँड ऑफ गोल्ड’ या नवव्या संगीत अल्बमवर काम सुरू केले असून तो जगातील शरणार्थीच्या पेचप्रसंगावर आधारित आहे. सध्या त्या भारत दौऱ्यावर असून समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा अल्बम तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.अनुष्का शंकर या प्रख्यात सतारवादक रवीशंकर यांच्या कन्या आहेत.
सध्या मी ज्या अल्बमवर काम करीत आहे तो जगातील शरणार्थीच्या समस्येवर आहे, कारण या समस्येने माझ्यावर खूप सखोल परिणाम झाला आहे. पॅरिस हल्ल्यात काय घडले. सीरियात काय चालू आहे. या सगळ्या शोकांतिका आहेत, त्यावर मी संगीताच्या माध्यमातून भाष्य करणार आहे असे त्या म्हणाल्या.
अनुष्का शंकर यांचा होम हा अलिकडचा पाचवा अल्बम ग्रॅमी नामांकनात होता. आताचा नवीन अल्बम लँड ऑफ गोल्ड नावाने केला जात असून लँड ऑफ गोल्डचा अर्थ मुलांसाठी सुरक्षित भूमी असा आहे. हा अल्बम शास्त्रीय संगीतावर आधारित नाही, असे त्या म्हणाल्या. अनुष्का या दोन वर्षांच्या खंडानंतर भारतात आल्या असून येथील लोक त्यांच्या चिंता बोलून दाखवू शकतात. आविष्कृत करू शकतात ही महत्वाची बाब वाटत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, येथे लोक चर्चा करतात ही फार छान गोष्ट आहे. जर लोक बोलले नाहीत तर ते धोक्याचे ठरेल व लोकांनी निषेध केला पाहिजे, वाद विवाद केले पाहिजेत, जे आवडत नाही त्याचा विरोध केला पाहिजे, तसे युक्तीवाद लोक करतात हेच लोकशाहीचे बलस्थान
आहे.
शास्त्रीय संगीतात भारतामध्ये अनेक महान कलाकार आहेत, या संगीताला नेहमीच श्रोते आहेत, या संगीतात आता बदल होत आहेत व ज्या दिशेने ते जात आहे ते बघता ते शाश्वततेक डे वाटचाल करीत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
अनुष्का शंकर या प्रख्यात सतारवादक रवीशंकर यांच्या कन्या असून त्यांच्यासमवेतच्या आठवणींना उजाळा म्हणून त्यांनी होम नावाचा अल्बम सादर केला आहे, त्याबाबत त्यांनी सांगितले की, काही प्रमाणात ते स्मरणरंजन असले तरी त्यात ताजेपणा आहे, त्याच संगीताचे जुने पैलू आहेत तसेच सुधारणांचाही मागोवा आहे. केवळ भूतकाळाशी नाते जोडण्याचा तो प्रयत्न नाही तर संगीताच्या माध्यमातून पुन्हा एकदा वडिलांशी तादात्म्य साधण्याचा प्रयत्न मी केला आहे.