अभिनेत्री करीना कपूर सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे ती तिच्या गरोदरपणामुळे. म्हणजे अगदी कपड्यांपासून ते तिच्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टपर्यंत अनेक गोष्टींमधून सध्या करीना आई होण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. एकीकडे आयुष्यातील या महत्वाच्या काळात स्वत:ची काळजी घेत असतानाच दुसरीकडे करीना कामही करताना दिसत आहे. करीनाने काही आठवड्यांपूर्वी आमिर खान सोबतच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी मुंबईबाहेर गेली होती. त्याचबरोबरच तीने आपल्या चॅट शोचे चित्रिकरणही सुरु ठेवले आहे. नुकताच तिने आपल्या चॅट शोमध्ये लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीला आमंत्रित केलं होतं. यावेळी नोराने करीनाकडे अशी काही मागणी केली की करीनाला काय बोलावं तेच कळेनासं झालं. मला तैमूरसोबत लग्न करायचं आहे असं नोरा मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हणाली आणि करीना खरोखरच स्पीचलेस झाली.

करीना कपूरने तिचा चॅट शो ‘वॉट वूमन वॉण्ट’ च्या नवीन भागामध्ये नोरा फतेहीसोबत गप्पा मारल्या आहेत. याच गप्पांदरम्यान नोराने तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. “मला अपेक्षा आहे की जेव्हा तैमूर मोठा होईल तेव्हा मी त्याच्यासोबत एन्गेजमेंट आणि लग्न करण्याचा विचार करु शकते,” असं नोरा म्हणाली. हे ऐकून करीना धक्काच बसला. करीनेने हसतच, “तो सध्या चार वर्षांचा आहे. त्याच्या लग्नाला खूप वेळ आहे,” असं उत्तर दिलं. त्यावर २८ वर्षीय नोराने “चालेल मी वाट पाहीन” असं उत्तर दिलं.

police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

 

View this post on Instagram

 

A post shared by (@filmy.mirchi)

या मुलाखतीमध्ये नोराने आपल्या बॉलीवूडमधील प्रवासासंदर्भात सविस्तर माहिती दिली. या क्षेत्रात भारतामध्ये कोणीही ओळखीचं नसताना इथे येऊन कशापद्धतीने स्ट्रगल करावा लागला आणि कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं यासंदर्भात नोरा भरभरुन बोलली. तसेच या प्रवासादरम्यान आलेले कटू अनुभव सांगताना एका कास्टींग डायरेक्टर आपल्याला ओरडल्याची आठवण नोराने सांगितली.  “त्याने अपमान करुन मला तिथून बाहेर जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मी घरी येऊन खूप रडले होते. मात्र या प्रसंगामधूनच मला लढत राहण्याची प्रेरणा मिळाली,” असं नोरा म्हणाली.