07 March 2021

News Flash

Oscars 2017 : प्रियांकाचा ‘काजू कतली’ लूक!

यंदाच्या ऑस्करमध्ये भारतीयांसाठी दोन गोष्टी मुख्य आकर्षणाचा विषय होत्या.

प्रियांका चोप्राच्या ड्रेसची तुलना 'काजू कतली'शी केली गेली.

यंदाच्या ऑस्करमध्ये भारतीयांसाठी दोन गोष्टी मुख्य आकर्षणाचा विषय होत्या. एक म्हणजे देव पटेलचा अभिनय असलेल्या ‘लायन’ चित्रपटाला सहा विभागात मिळालेले नामांकन आणि प्रियांका चोप्राचा रेड कार्पेटवरील वावर. कालच्या रंगतदार आणि बहुचर्चित ऑस्कर सोहळ्यानंतर आता ट्रोलिंगने आपले डोके वर काढले आहे. याचे खास कारण आहे ते प्रियांकाने परिधान केलेला ड्रेस. राल्फ आणि रुस्सोने डिझाईन केलेला पांढऱ्या आणि चंदेरी रंगाचा आकर्षक गाऊन परिधान करून प्रियांका ८९ व्या ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरली होती. कानातील डायमंड रिंग, बाजूला भांग असलेली स्ट्रेट केसांची हेअर स्टाईल आणि हातात घातलेली हॅण्डकफ्स प्रियांकाच्या सौंदर्यात भर घालत होती. ‘बेवॉच’ या तिच्या आगामी हॉलिवूडपटातील सह-अभिनेता ड्वेन जॉनसनसोबतचे तिचे रेड कार्पेटवरील हसतमुख संभाषण उपस्थितांच्या माना वळविणारे होते. परंतु, सोशल मीडियावर ही पोस्ट समोर येईपर्यंत सर्व काही अलबेल होते.

बॉलिवूड अभिनेत्री सोनमने कानमध्ये परिधान केलेल्या ड्रेसची ‘ऑमलेट’, ‘इडली’, ‘पक्षी’ आणि ‘केसाळ माकडा’शी तुलना करणारे आणि रिहानाच्या ड्रेसला ‘पिझ्झा’ची उपमा देणाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कल्पनाशक्तिची दारे उघडली. यावेळी निशाण्यावर होता तो ८९ व्या ऑस्कर सोहळ्यातील प्रियांकाचा रेड कार्पेटवरील लूक. प्रियांकाच्या ड्रेसची तुलना ‘काजू कतली’शी केली गेली. त्यानंतर, सोशल मीडियावर प्रियांकाच्या बाजूने मत नोंदविणाऱ्या आणि ‘काजू कतली’ उपमेला पसंती देणाऱ्या कमेंटसचा ओघ सुरू झाला.

दरम्यान, ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या कॉकटेल आणि आफ्टर पार्टीमध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा बॉलिवूडच्या या दोन दिग्गज अभिनेत्रींनी आपल्या ग्लॅमरस लूकने अनेकांनाच घायाळ केले. दोघींनीही काळ्या रंगाचाच ड्रेस परिधान केला होता. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दोघींचेही सौंदर्य खुलून दिसत होते. त्यांच्या हॉलिवूड वावरामुळे दोघींमध्ये खटके उडत असल्याच्या चर्चांनी जोर धरला असला तरी, एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने याचे खंडण केले. प्रियांका आणि आपल्यात शत्रुत्व नसल्याचा खुलासादेखील तिने केला.

प्रियांका चोप्रा (फोटो - टि्वटर) प्रियांका चोप्रा (फोटो – टि्वटर) फोटो - रिचर्ड शॉटवेल,इनव्हिजन,एपी फोटो – रिचर्ड शॉटवेल,इनव्हिजन,एपी ऑस्कर २०१७ मध्ये प्रियांका चोप्रा ऑस्कर २०१७ मध्ये प्रियांका चोप्रा ऑस्कर २०१७ मध्ये प्रियांका चोप्रा ऑस्कर २०१७ मध्ये प्रियांका चोप्रा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 5:42 pm

Web Title: oscars 2017 priyanka chopra red carpet appearing dress trolling kaju katli
Next Stories
1 आलिया भट्टने वडिलांना म्हटले खोटारडे
2 ‘सरकार ३’ मधील ही व्यक्तिरेखा आदित्य ठाकरेवर आधारित?
3 ‘त्या’ पालकांविरोधात लढण्यासाठी आईसोबत न्यायालयात गेला धनुष
Just Now!
X