जगभरात कोविड-१९ चे संकट वाढत असताना आपल्‍यापैकी अनेकांनी घरात राहत घरातूनच काम करण्‍याच्‍या नवीन नियमांशी जुळवून घेतले आहे. पण ही सोय सर्वांनाच अनुभवता येत नाही. पोलीस दल कोविड-१९ विरोधात लढण्‍यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. करोना विरोधातील युद्धामध्‍ये ते अग्रस्‍थानी आहेत आणि त्‍यांना या विषाणूचा संसर्ग होण्‍याचा सर्वाधिक धोकादेखील आहे. रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच मुंबई पोलिसांना मदत करण्‍याच्‍या उद्देशाने आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ चित्रपटाचे निर्माते रोहित शेलटकर यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्यासाठी ते सप्‍लीमेण्‍ट्सचं वाटप करत आहेत.

वेलमॅन हे रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी आणि पुरूषांच्‍या एकूण आरोग्‍यासाठी वैज्ञानिकदृष्‍ट्या सुत्रीकरण करण्‍यात आलेले सप्‍लीमेण्‍ट असून वेलवुमन हे महिलांचे आरोग्‍य व रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी खास तयार करण्‍यात आले आहे. रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणारे वेलमॅनचे ४०००० युनिट्स आणि वेलवुमेनच्या ६००० युनिट्सचे वाटप कंपनी करणार आहे. तसेच संपूर्ण दलाला अल्‍ट्रा डी३ जीवनसत्त्व ड चे ४६००० पॅक्‍सचे देखील वाटप करणार आहे.

याविषयी रोहित शेलटकर म्‍हणाले, ”वेलमॅन व वेलवुमन टॅब्‍लेट्स वैज्ञानिकदृष्‍ट्या संशोधन करण्‍यात आले आहेत आणि या टॅब्‍लेट्समधून रोगप्रतिकारक शक्‍ती वाढत असल्‍याचे दिसून आले आहे. पोलिसांच्या आरोग्यासाठी आम्ही या टॅब्लेट्सचं वाटप करत आहोत.”