News Flash

‘रुपेरी पडद्यावरील ‘आशा’ प्रियांकाने साकारावी’

माझ्या आयुष्यावर कोणी चरित्रपट तयार केला तर त्या चित्रपटात प्रियांका चोप्रा हिने माझी भूमिका साकार करावी

‘रुपेरी पडद्यावरील ‘आशा’ प्रियांकाने साकारावी’

माझ्या आयुष्यावर कोणी चरित्रपट तयार केला तर त्या चित्रपटात प्रियांका चोप्रा हिने माझी भूमिका साकार करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी नुकतेच मुंबईत केले. झी क्लासिक वाहिनीतर्फे विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आशा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  प्रियांका ही उत्तम गायक व अभिनेत्रीही आहे. त्यामुळे माझ्या चरित्रपटात माझी भूूमिका तिनेच करावी, असेही भोसले यांनी सांगितले.या कार्यक्रमास हिंदी चित्रपटसृष्टीतील झीनत अमान, मौसमी चॅटर्जी, शर्मिला टागोर, आशा पारेख, डिम्पल, हेलन, तब्बू, जयाप्रदा, शान आदी मान्यवर उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातील मान्यवरही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 12:41 am

Web Title: priyanka chopra is the best choice for my biopic says asha bhosle
Next Stories
1 आमीरचा नवा ‘लुक’
2 ‘वजनदार’ प्रिया बापट आणि सई ताम्हणकर
3 .. या अभिनेत्रीने लपवून ठेवलीय ‘गोड बातमी’?
Just Now!
X