30 September 2020

News Flash

रानू मंडल यांनी हिंदीत नव्हे तर मल्याळममध्ये गायलं गाणं, व्हिडीओ व्हायरल

गाणे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रतिभावान कलाकाराला जर अपेक्षित संधी मिळाली तर तो कलाकार काय करुन दाखवू शकतो याचे एक ताजे उदाहरण म्हणजे रानू मंडल. रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन आपले पोट भरणाऱ्या रानू मंडल यांना प्रसिद्ध गायक हिमेश रेशमीया याने आपल्या चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांचे आयुष्यच पार बदलून गेले. सेलिब्रिटी स्टेटस मिळवलेल्या रानू यांनी अलिकडेच एका रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली. या गाण्याच्या शोमध्ये त्यांनी गायलेले गाणे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

#welcome @ranumondal.offical #asianet #asianetnews #love #support #india#comedystars

A post shared by Ranu Mondal (@ranumondal.offical) on

मल्याळम भाषेतील एका विनोदी रिअॅलिटी शोमध्ये रानू यांना अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर एक मल्याळम गाणे गायले. त्यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेले हे गाणे पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 8:07 pm

Web Title: ranu mondal sing malayalam song video viral mppg 94
Next Stories
1 Video: ‘बाला’च्या सक्सेस पार्टीत आयुषमान आणि राजकुमारचा बेधुंद डान्स बघितला का?
2 अरबाज खानची गर्लफ्रेंड ‘या’ वेब सीरिजमध्ये दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत
3 MMS मुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पोस्ट केले बोल्ड फोटो
Just Now!
X