दीपिका आणि रणवीर म्हणजे बॉलिवूडमधली ‘रब ने बना दी जोडी’ होय. जिथे बॉलिवूडमध्ये प्रत्येक नाती ही अनिश्चिततेच्या पायावर उभी असतात तिथे या दोघांनी आपली प्रेमकहाणी पूर्णत्त्वास नेऊन दाखवली. गेल्याच महिन्यात हे जोडपं विवाहबंधनात अडकलं. संजय लिला भन्साळींच्या ‘रामलीला’ या चित्रपटापासून दोघांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली. मात्र त्याही आधीची ‘प्रेमाची गोष्ट’ दीपिकानं नुकतीच एका मुलाखतीत सांगितली.

‘त्यावेळी मी यशराजच्या ऑफिसमध्ये कामानिमित्त गेले होते, रणीवीरही तिथेच होता. त्यान्ं सर्वांकडे दुर्लक्ष करत माझ्याशी फ्लर्ट करायला सुरूवात केली. इतकंच नाही त्यावेळी तो कोणालातरी डेट करत होता. अखेर तू जास्त फ्लर्ट करतोय हे मला त्याला सांगावं लागलं होतं’, असं म्हणत दीपिकानं जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘रामलीला’ चित्रपटासाठी आम्ही दोघांनी संजय लीला भन्साळींची भेट घेतली. त्यांनी आम्हा दोघांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी देखील त्यानं माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयक्न केला होता असंही दीपिका म्हणाली. ‘रामलीला’ चित्रपटापासून दोघांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली होती. सहा वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत आहे. १४ नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो परिसरात दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकले.