बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा योगा आणि फिटनेसमुळे अधिक चर्चेत असते. शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच फिटनेस किंवा कुटुंबासंबधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आज ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिल्पाने सोशल मीडियावर सगळ्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, त्या शुभेच्छांवरून लोकांनी शिल्पालाच ट्रोल केल्याचा प्रकार घडला.

शिल्पाने ट्विटरवरून ट्वीट करत सगळ्यांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शुभेच्छा देताना शिल्पाने प्रजासत्ताक दिनाऐवजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “तुम्हाला सगळ्यांना ७२व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक भारतीयाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेले सर्व अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्याची शपथ घेऊया”, असं ट्वीट तिने केलं. यामुळेच शिल्पा ट्रोल झाली.

आपली चूक लक्षात येताच शिल्पाने ते ट्वीट डिलीट केले आणि दुसरे अचूक ट्वीट केले. पण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. एक नेटकरी म्हणाला, “तू कधी शाळेत गेली होतीस की नाही. प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवसातला फरक समजत नाही.”

Aaj subah hi nasshe kiya tha na

आपली चूक लक्षात येताच शिल्पाने ते ट्वीट डिलीट केले आणि दुसरे अचूक ट्वीट केले. पण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. एक नेटकरी म्हणाला, “तू कधी शाळेत गेली होतीस की नाही. प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवसातला फरक समजत नाही.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम शिल्पा मॅम.” हे सारं इथेच थांबलं नाही. “तू जरी ते ट्वीट डिलीट केलं असलंस तरी आम्ही सगळ्यांनी ते पाहिलं होतं”, असं म्हणत अनेकांनी तिच्या चुकीच्या ट्वीटचा स्क्रीनशॉटदेखील व्हायरल केला.