News Flash

बर्थ डे केक पाहून अशी असेल सोनमची प्रतिक्रिया, आनंदने केला फोटो शेअर

या सा-यातून वेळ काढत सोनम आणि आनंद लंडनमध्ये आपला क्वालिटी टाईम घालविण्यासाठी गेले आहे.

Sonam Kapoor birthday

Sonam Kapoor birthday : बॉलिवूडमध्ये बहुचर्चित ठरलेला सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. आतापर्यंत चर्चेत ठरलेल्या सर्व विवाहसोहळ्यांपैकी सोनमचा विवाह प्रचंड चर्चेत आला होता. अगदी तिच्या संगीत सोहळ्यापासून ते लग्नानंतर तिने नावात केलेल्या बदलापर्यंत सोनमच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट गाजली. मात्र या सा-यातून वेळ काढत सोनम आणि आनंद लंडनमध्ये आपला क्वालिटी टाईम घालविण्यासाठी गेले आहे. यावेळी सोनमने येथील प्रत्येक फोटो शेअर केल्याचं दिसून येत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये आणखी एका फोटोची भर पडली आहे. विशेष म्हणजे हा फोटो आनंदने शेअर केला असून त्याला साजेशी कॅप्शनही दिली आहे.

मुंबईमध्ये जन्मलेल्या सोनमचा आज ३३ वा वाढदिवस आहे. लग्नानंतर सोनमचा हा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे तिच्यासाठी तो खास असणार यात शंका नाही. मात्र हा वाढदिवस सेलिब्रेट करण्याची खरी जबाबदारी आहे ती आनंदवर. यामुळे सोनमला सरप्राईज देण्यासाठी आनंदनेही कंबर कसली असून तो जीवतोड मेहनत करुन सोनमसाठी बर्थ डे प्लान करत आहे. हा प्लॅन करत असतानाच आनंदने मज्जा म्हणून सोनमचा एक फोटो शेअर केला असून एका अनोख्या पद्धतीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आनंदने शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनमने डोक्यावर पदर ओढला असून ती शुन्यामध्ये नजर लावून बसली आहे. त्यातच हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे या फोटोची शोभा अधिक वाढली आहे. फोटो शेअर केल्यानंतर आनंदने कॅप्शनमध्ये ‘बर्थ डेचा स्पेशल केक पाहिल्यानंतर सोनमची प्रतिक्रिया अशीच असणार आहे’, असं म्हटलं आहे.

आनंदने हा फोटो शेअर करत सोनमला एका नव्या अंदाजात शुभेच्छा दिल्या असल्या तरी सोनमसाठी त्याने एखाद्या खास सरप्राईजची तयारी केली असणार यात शंका नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 5:55 pm

Web Title: sonam kapoor birthday today sonam turns 33 anand funny birthday wish for wife
Next Stories
1 ‘रेस ३’मध्ये पुन्हा एकदा सलमान- मिकाची जादू चालणार
2 ‘या’ व्यक्तीच्या येण्यामुळे शिल्पाचा वाढदिवस झाला खास
3 स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’
Just Now!
X