03 June 2020

News Flash

स्वरा भास्करसाठी सोनम कपूरची खास पोस्ट, म्हणाली…

सोनमची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

बॉलिवूडमध्ये आपल्या बिनधास्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. स्वरा बऱ्याच वेळा सामाजिक प्रश्नांवर देखील उघडपणे तिचे मत मांडत असते. या बिनधास्त स्वराचा आज ९ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. पण लॉकडाउनमुळे स्वराला तिचा वाढदिवस घरात कुटुंबीयांसोबत साजरा करावा लागणार आहे. सोशल मीडियावर स्वराच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण या सर्वामध्ये लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सोनम कपूरच्या पोस्टने.

अभिनेत्री सोनम कपूरने स्वराला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर त्या दोघींचा जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोनम कपूरच्या लग्नातील एका कार्यक्रमामधील आहे. या फोटोमध्ये दोघीही अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत असून त्यांच्या हाताला मेहेंदी दिसत आहे. दोघींचाही पारंपरिक लूक पाहण्यासारखा आहे.

हा फोटो पोस्ट करत सोनमने स्वरासाठी खास संदेश लिहिला आहे. ‘स्वरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा उत्साह आणि धैर्य हे प्रेरणादायी आहे. तु नेहमी अशीच रहा. लॉकडाउन संपल्यावर आपण तुझा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजका करु’ असे तिने कॅप्शन दिले आहे.

स्वरा आणि सोनम दोघीही अत्यंत जवळच्या मैत्रीणी असल्याचे म्हटले जाते. त्यांनी ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 6:13 pm

Web Title: sonam kapoor shares special post for swara bhasker on her birthday avb 95
Next Stories
1 एण्ट्री घेतानाच ‘अंडरटेकर’च्या कपड्यांना लगाली होती आग; अन् त्यानंतर…
2 ‘या’ गोष्टी करोनाशी लढायला मदत करतात, करोनाग्रस्त अभिनेत्रीचा खुलासा
3 Coronavirus : क्वारंटाइन रुग्णांसाठी आपलं हॉटेल देण्याचा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचा निर्णय
Just Now!
X