13 August 2020

News Flash

सनीसाठी प्रियांका चोप्रा प्रेरणादायी

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे अभिनेत्री सनी लिओनीचे म्हणणे आहे. मुंबईत पार पडलेल्या एका मासिकाच्या मुखपृष्ठाच्या अनावरण कार्यक्रमाला पती...

| January 20, 2015 06:26 am

sunny-leone-priyanka-450बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे अभिनेत्री सनी लिओनीचे म्हणणे आहे. मुंबईत पार पडलेल्या एका मासिकाच्या मुखपृष्ठाच्या अनावरण कार्यक्रमाला पती डॅनिअल वेबरबरोबर ती उपस्थित होती. यावेळी तिला आवडत्या हिंदी अभिनेत्रींविषयी विचारले असता ती म्हणाली, माझ्या मते विद्या बालन चांगली अभिनेत्री आहे आणि कंगना राणावरदेखील खूप छान काम करते. त्याचप्रमाणे प्रियांका चोप्राला कामाशी निगडीत सर्व क्षेत्रांची चांगली माहिती आहे. सर्व क्षेत्रातील तिचा वावर हा अतिशय सहज असा असतो. बॉलिवूडमधली ती सर्वात प्रेरणादायी अभिनेत्री आहे. मी इथे असताना तिचे काम जवळून पाहते, तर अमेरिकेत परतल्यावर मला तिच्या संगीत अल्बमचे मोठे फलक पाहायला मिळतात. तिचे हे फलक पाहून मला अभिमान वाटतो. ती भारतीय असून, माझे मूळदेखील भारतातच असल्याने मला तिचा अभिमान आहे. तिचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे. आगामी ‘मस्तिजादे’ चित्रपटात सनी लिओनी तुषार कपूर आणि वीर दासबरोबर दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2015 6:26 am

Web Title: sunny leone finds actress priyanka chopra inspiring
Next Stories
1 यशवंत देव यांचा जीवनपट उलगडणार!
2 आई आणि मुलगा एकाच चित्रपटात
3 सोहा आणि कुणाल अडकणार लग्नबंधनात!
Just Now!
X