छोट्या पडद्यावर प्रसिध्दी मिळवल्यानंतर सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडमध्ये झपाट्याने यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. मात्र, गेले कित्येक दिवसापासून माध्यमांच्या कॅमे-यापासून दूरदूर असलेला सुशांत सिंह राजपूत नुकताच नव्या लूकमध्ये दिसला आहे. त्याच्या आगामी डिटेक्टिव व्योमकेश बक्षीच्या चित्रीकरणादरम्यानची छायाचित्रे सोशल मिडियामध्ये प्रदर्शित झाली आहेत.
फोटो गॅलरी: ‘डिटेक्टिव व्योमकेश बक्षी’मधील सुशांत सिंगचा नवा लूक
कोलकाता शहरात या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण झाले आहे. डिटेक्टिव्ह व्योमकेश बॅनर्जी’ चित्रपटाची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्यामुळे १९४०सालचा काळ तंतोतंत उभा करण्यासाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. ‘डिटेक्टिव व्योमकेश बक्षी’ हा चित्रपट दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित करत असून यशराज बॅनर याची निर्मिती करत आहे. याच वर्षी सुशांत सिंग आमिर खानसोबत ‘पीके’ चित्रपटात झळकणार आहे.