अजय देवगन, काजोल, सैफ अली खान यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी भरलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सातव्या आठवड्यात देखील तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. १० जानेवारीला प्रदर्शित झालेल्या तान्हाजीने ४१ दिवसांमध्ये जगभरातून तब्बल ३४७ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे.

अवश्य पाहा – रुपेरी पडद्यावर ‘सविता भाभी’ साकारणारी पहिली अभिनेत्री

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर कसं होत? पाहा त्यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलेलं पत्र

बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार विदेशामध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत ‘तान्हाजी’ हा सोळावा चित्रपट आहे. भारतात या चित्रपटाने ३१४ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. परिणामी आता या चित्रपटाची गणना भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत केली जात आहे.

अवश्य पाहा – रणबीर चांगला मुलगा आहे पण… ; लग्नाच्या प्रश्नावर आलियाची गुगली

गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. यामुळे एकाच दिवशी दोन किंवा तीन चित्रपट देखील प्रदर्शित होताना आपण पाहत आहोत. परिणामी कुठलाही चित्रपट बाजारात एक आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकत नाही. एक आठवडा झाला की लगेचच प्रेक्षकांचे लक्ष पुढल्या आठवड्यातील चित्रपटांकडे लागते. परंतु ‘तान्हाजी’ त्याला अपवाद ठरत आहे. असंख्य वाद-विवाद आणि मिश्र समिक्षणानंतरही तान्हाजी सातव्या आठवड्यात देखील जोरदार कमाई करताना दिसत आहे.