22 September 2020

News Flash

‘या’ अभिनेत्रीने केला चक्क रिक्षाने प्रवास

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

(छाया सौजन्य- पिंकव्हिला)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी कोणता ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायकाचा कलाविश्वात पूर्वीसारखा फारसा वावर राहिलेला नाही. मात्र तरीदेखील बॉलिवूडमध्ये कायम तिच्या नावाची चर्चा सुरु असतेच. काही दिवसांपूर्वी मलायकाने तिचा ४६वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला होता. तिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता देखील मलायकाचे बाहेर फिरतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हे फोटो पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.

‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार मलायकाने तिच्या महागड्या गाड्या सोडून चक्क रिक्षाने प्रवास केला आहे. दरम्यान मलायकासोबत तिची आई देखील रिक्षामध्ये असल्याचे दिसत आहे. सध्या मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेहमी हॉट लूकने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या मलायकाने सामान्य माणसांप्रमाणे रिक्षाने प्रवास करत चाहत्यांच्या मनात घर केले आहे. मलायकाने रिक्षामधून प्रवास करताना पांढऱ्या रंगाचा लांब शर्ट परिधान केला असून त्यावर शोभून दिसतील असे बूट आणि टोपी घातली होती. या लूकमध्ये मलायका अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरल अंदाजात दिसत होती.

(छाया सौजन्य- पिंकविला)

मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात व्हिडीओ जॉकी म्हणून केली. त्यानंतर ती अनेक गाण्यांमध्ये किंवा म्युझिक अल्बममध्ये झळकली. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरमुळे चर्चेत येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. डिनर डेटवर जाण्यापासून ते एखाद्या पार्टीला एकत्र हजेरी लावण्यापर्यंत दोघांना एकत्र पाहिले जाते. मात्र मलायका आणि अर्जुन लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी नेहाच्याच चॅट शोमध्ये मलायकाने तिच्या ड्रीम वेडिंगविषयीही अनेक गोष्टी सांगितल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 8:38 am

Web Title: this bollywood actress ditches car and travel by auto avb 95
Next Stories
1 सलमानच्या बहिणीचा घटस्फोटीत नवरा करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट
2 हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने जिजा मातेचं पुढचं पाऊल
3 रानू मंडल यांची मेकअपवरून खिल्ली उडवणाऱ्यांना ट्विटरकरांनी झापले
Just Now!
X