23 January 2018

News Flash

टिव्ही अभिनेत्याच्या पत्नीला तुरुंगात डांबले

गेल्या महिन्याभरापासून ती तुरुंगात आहे.

मुंबई | Updated: August 11, 2017 11:58 AM

डॉ. रुबी टंडन गेल्या महिन्याभरापासून दुबईतील अल रफ्फा तुरुंगात आहे.

‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अमित टंडन नंतर अभिनय क्षेत्राकडे वळला. अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये झळकलेला गायक, अभिनेता अमित सध्या कठीण काळातून जातोय. त्याची पत्नी डॉ. रुबी टंडन गेल्या महिन्याभरापासून दुबईतील अल रफ्फा तुरुंगात आहे. आपल्या पत्नीची जामीनावर सुटका करण्यासाठी अमितने बरेच प्रयत्न केले. मात्र, त्याला त्यात अपयश आले. ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप दुबई आरोग्य प्राधिकरणाने रुबीवर लावला आहे. पण, रुबीला या प्रकरणात गुंतवले जात असल्याचे अमितने म्हटलेय.

वाचा : कोणाचे रेस्तराँ तर कोणाची एअरलाइन्स, जाणून घ्या साउथ स्टार्सचे साइड बिजनेस

अमित म्हणाला की, गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणाऱ्या आणि औषधोपचार करणाऱ्या मेहनती महिलेला अशा परिस्थितीत गुंतवले जात असल्याने मला वाईट वाटतेय. डॉ. रुबीने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधील सेलिब्रिटींवरही औषधोपचार केले आहेत. विरोधक आणि काही प्रभावशाली लोक तिचे हे यश पाहू शकत नाहीत. तिच्यावर लावण्यात आलेल्या चुकीच्या आरोपामुळे तिला एक महिन्यापेक्षाही अधिक काळ तुरुंगात राहावे लागलेय. दरम्यान, रुबी आणि अमितमध्ये काही घरगुती वाद सुरु होते. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचाही निर्णय घेतलेला. असे असले तरी कठीण समयी अमित रुबीच्या पाठिशी असून, तिला या प्रकरणातून सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दोघांच्या लग्नाला दहा वर्षे झाली असून, त्यांना सात वर्षांची मुलगी आहे.

वाचा : वर्षाला १०० कोटींपेक्षाही अधिक कमाई करतो हा अभिनेता

रुबी ही प्रसिद्ध त्वचा रोगतज्ज्ञ (dermatologist) असून, अनेक टेलिव्हिजन आणि बॉलिवूड सेलिब्रिटी तिच्याकडे उपचारासाठी येतात. या सेलिब्रिटींमध्ये मौनी रॉय, संजिदा शेख, इकबाल खान, लकी मोरानी, रोहित वर्मा, विक्रम भट्ट, निर्माती सुहाना सिन्हा यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नाव यात आहेत.

First Published on August 11, 2017 11:58 am

Web Title: tv actor amit tandons wife ruby in dubai jail
  1. No Comments.