News Flash

‘विरुष्का’च्या लग्नानंतर अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल

अनुष्का बेधुंद होऊन नाचायला लागते.

विराट कोहली, अनुष्का शर्मा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न झाल्यापासून त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीची नव्याने चर्चा रंगताना दिसत आहे. दोघांनी भारतीय मीडियाचा ससेमिरा टाळण्यासाठी इटलीत जाऊन लग्न केले असले तरी ‘विरुष्का’ प्रसारमाध्यमांतील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मीडियाकडून विराट आणि अनुष्का यांच्याविषयीची प्रत्येक गोष्ट नव्याने सांगितली जात आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत अनुष्का बेधुंद होऊन डान्स करताना दिसतेय. मात्र, हा व्हिडिओ खराखुरा नसून एका प्रसाधनगृहातील उत्पादने बनवणाऱ्या एका कंपनीची जाहिरात आहे. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अनुष्का आपल्या कुत्र्याचा पाठलाग करत शेजाऱ्यांच्या घरात जाते. यावेळी शेजाऱ्यांच्या घरातील प्रसाधनगृहाची सजावट आणि तेथील आकर्षक उत्पादने पाहून अनुष्का हरखून जाते आणि त्याठिकाणी बेधुंद होऊन नाचायला लागते, अशी या जाहिरातीची साधारण थीमलाईन आहे.

वाचा : काही पत्रकार फुकटची दारु प्यायला येतात; ऋषी कपूर यांचे वादग्रस्त विधान

एरवी ही जाहिरात व्हायरल होण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, ‘विरुष्का’च्या लग्नानंतर त्यांच्याबाबतीतील प्रत्येक गोष्टीला नव्याने सादर केले जात असल्याने ही जाहिरात पुन्हा चर्चेत आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 6:55 pm

Web Title: virat kohli anushka sharma washroom ad video viral on social media
Next Stories
1 पुरस्कार सोहळ्यातील प्रत्येक मिनिटासाठी प्रियांका चोप्रा घेते एवढे मानधन?
2 काही पत्रकार फुकटची दारु प्यायला येतात; ऋषी कपूर यांचे वादग्रस्त विधान
3 शहिद सैनिकाच्या मुलीचे अनुभव ऐकून शाहरूखचे डोळे पाणावले
Just Now!
X