News Flash

Bigg Boss Marathi 2 : नेहा की शिव, कोण होणार पहिला कॅप्टन?

घरातील सदस्य पहिला कॅप्टन बनण्याचा मान कोणाला देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'बिग बॉस मराठी २'

बिग बॉस मराठीच्या घरातील गुरुवारचा दिवस खूप वादग्रस्त आणि भावूक ठरला. वीणा आणि नेहाला डोक्यावर अपात्र लिहून आणि गळ्यात पाटी लटकवून घरामध्ये वावरण्यास बिग बॉसने सांगितले. तर काल पराग आणि वैशालीमधील वाद, रुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकलेमधील वाद खूप टोकापर्यंत गेला. एकीकडे वीणा आणि शिवानीमध्ये बाचाबाची झाली तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात KVR ग्रुप तयार झाला.

शुक्रवारचा दिवस जरा हलकाफुलका जाणार आहे. सगळ्या सदस्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात नागिन डान्सने होणार आहे. त्याचसोबत KVR ग्रुपची एकता आणि त्यांची इच्छा काय आहे हे बघायला मिळणार आहे. दुसरीकडे बिग बॉसच्या घरात जोपर्यंत लाइट्स बंद होत नाही तोपर्यंत सदस्यांना झोपण्यास सक्त मनाई असते. बरेच सदस्य या नियमाचे उल्लंघन करताना दिसणार आहेत.

या सर्व घडामोडींमध्ये सर्वांत उत्सुकतेची बाब म्हणजे ‘बिग बॉस मराठी २’चा पहिला कॅप्टन कोण होईल हे कळणार आहे. याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. अभिजित बिचुकले यांच्या टीममधून नेहा आणि वैशाली म्हाडेच्या टीममधून शिव यांना कॅप्टन्सीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातील सदस्य पहिला कॅप्टन बनण्याचा मान कोणाला देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 1:37 pm

Web Title: who will be first captain of the house bigg boss marathi 2
Next Stories
1 काजोल साकारणार जयललिता यांची भूमिका ?
2 Video : बॉलिवूडमधील घराणेशाहीवर ‘बधाई हो’ फेम नीना गुप्ता म्हणतात..
3 सरकारला प्रश्न विचारायला का घाबरायचं?- अनुराग कश्यप
Just Now!
X