News Flash

या चित्रपटातून पुन्हा पाहता येणार सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री

गेला काही काळ या दोन्ही कलाकारांनी स्क्रिन शेअर केली नव्हती.

सलमान आणि कतरिनाला पडद्यावर आणि पडद्यामागेसुद्धा रसिकांनी नेहमीच पसंत केले आहे.

अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ ही काही गाजलेल्या ऑनस्क्रिन जोड्यांपैकी एक जोडी. ‘युवराज’, ‘मैने प्यार क्यू किया’, ‘एक था टायगर’ यांसारख्या हिट चित्रपटांतून सलमान आणि कतरिना ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्यांच्यातले नाते सहकलाकारांपलीकडले असल्याच्या चर्चांनाही मध्यंतरी उधाण आले होते. सलमान आणि कतरिनाला पडद्यावर आणि पडद्यामागेसुद्धा रसिकांनी नेहमीच पसंत केले आहे. पण गेला काही काळ या दोन्ही कलाकारांनी स्क्रिन शेअर केली नव्हती. पण आता एका चित्रपटाच्या निमित्ताने भाईजान सलमान आणि कॅट पुन्हा एकदा येणार आहेत.
‘बकरी ईद’च्या निमित्ताने यशराज फिल्म्सतर्फे ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. यशराज फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टीही जाहिर करण्यात आल्या आहेत. याआधी ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान आणि कतरिना यांनी कबीर खान यांच्या दिग्दर्शनात काम केले होते. सलमानने साकारलेल्या टायगरला सिनेरसिकांनी प्रचंड दाद दिली होती. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर कबीर खान आणि सलमान खान यांच्या जोडीने ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.
कबीर खानच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानेही बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असून या चित्रपटाचे दिग्दर्शनही कबीर खानच करत आहे.
नव्याने येणाऱ्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार असल्याचे या ट्विटमधून सांगण्यात आले आहे. भाईजानच्या एकामागून एक येणाऱ्या चित्रपटांसाठी चाहत्यांमध्ये कमीलीची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाचे कथानक आणि इतर माहिती अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. पण पुढच्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये सलमानचा ‘टायगर’ पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार हे नक्की झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 6:32 pm

Web Title: yash raj films revealed the first look of tiger zinda hai staring salman khan and katrina kaif
Next Stories
1 ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये असाही दिसेल आमिर खान
2 ड्वेन ब्राव्होची बॉलीवूडमध्ये एण्ट्री!
3 ‘बेफिक्रे’च्या या तीन मिनिटांच्या गाण्यात २५ चुंबनदृश्ये..
Just Now!
X