ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चंद्र मोहन यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे चंद्र मोहन यांची आज (११ नोव्हेंबर रोजी) प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे ७८ व्या वर्षी निधन झाले. ते पाच दशकांहून अधिक काळ तेलुगू सिनेसृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शेवटच्या आरोपीला हायकोर्टाने मंजूर केला जामीन; न्यायमूर्ती म्हणाले, “ही सुनावणी…”

what devendra fadnavis Said?
“माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश करतो”, देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?

अभिनेता ज्युनियर एनटीआरने चंद्र मोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचं अकाली निधन दुःखद असल्याचं तो म्हणाला. एक्सवरील एका पोस्टमध्ये ज्युनियर एनटीआरने लिहिलं, “अनेक दशकांपासून चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून स्वत:ची एक विशेष ओळख निर्माण करणारे चंद्र मोहनजी यांचे अकाली निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटतंय. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

चंद्र मोहन यांचे हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर हृदयाशी संबंधित उपचार सुरू होते. अभिनेता साई धरम तेजनेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “एक असा चेहरा जो आपल्या जुन्या आठवणी जागवतो, आपल्या अभिनय आणि भूमिकांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटवतो. चंद्र मोहन सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो,” असं त्याने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

चंद्र मोहन यांना त्यांच्या कामासाठी दक्षिणेतील एक फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन नंदी पुरस्कार मिळाले आहेत. ‘रंगुला रत्नम’, ‘पदहारेल्ला वायासू’, ‘सिरी मुव्वा’, ‘नलाई नमाधे’, ‘सीतामालक्ष्मी’, ‘राम रॉबर्ट रहीम’, ‘राधा कल्याणम’, ‘रेंदू रेल्लू आरू’ आणि ‘चंदामामा रावे’ या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.