scorecardresearch

“दोन्ही देशांमधील…” फवाद खानची ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’च्या भारतातील प्रदर्शनावर पहिली प्रतिक्रिया

फवाद खानच्या ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’चं भारतातील प्रदर्शन ढकललं पुढे, अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत

“दोन्ही देशांमधील…” फवाद खानची ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’च्या भारतातील प्रदर्शनावर पहिली प्रतिक्रिया
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट १९७९ साली आलेल्या ‘मौला जट’ नावाच्या चित्रपटावर बेतलेला आहे. हमजा अली अब्बासी, हुमैमा मलिक आणि माहिरा खान यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात फवाद खान मौला जट्टच्या भूमिकेत आहे, त्याला एक लोकनायक म्हणून दाखवण्यात आलंय. चित्रपट ऑक्टोबर महिन्यात जगभरात प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. तो भारतातही प्रदर्शित होणार होता, पण राजकीय विरोधामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. अशातच मुख्य अभिनेता फवाद खानने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“मला भेटली तर थोबडवून काढेन…” उर्फी जावेदच्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक

हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तर ते उत्तम होईल, असं फवाद खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय. तो सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाल्यास ते खूप चांगलं होईल. असं झाल्यास दोन्ही देशांना हस्तांदोलन करण्याचा हा एक चांगला मार्ग असेल. हे ईद आणि दिवाळीला आपण एकमेकांना पाठवलेल्या मिठाई आणि शुभेच्छांसारखं आहे. चित्रपट आणि संगीत ही एक प्रकारची देवाणघेवाण आहे. पण तरीही गोष्टी दोन्ही देशांमधील वातावरण थोडं तापलेलं आहे. हा चित्रपट भारतात रिलीज होऊही शकतो आणि कदाचित नाहीही होणार, पाहूयात काय होतंय ते.”

“कोणती नशा करतोस?” मोदींच्या आईंना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केल्याने शाहरुख खान ट्रोल, नेमकं काय घडलं?

हा चित्रपट भारतात रिलीज होणार होता पण आता त्याचं प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. मल्टिप्लेक्स चेन, आयनॉक्स येथे काम करणार्‍या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “आम्हाला वितरकांनी कळवले आहे की चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे आम्हाला दोन-तीन दिवसांपूर्वी सांगण्यात आलं. यापुढील कोणतीही तारीख आमच्याबरोबर शेअर करण्यात आलेली नाही.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 07:49 IST

संबंधित बातम्या