छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील ‘या’ अभिनेत्याला ओळखलेत का?

कोण आहे हा अभिनेता..

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील एका कलाकाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील फोटो व्हायरल झाला आहे. पण हा अभिनेता नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आर. माधवन आहे.

नुकताच आर. माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आर माधवन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहत्यांनी माधवनच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

PHOTOS: आर माधवनचे मुंबईमधील आलिशान घर एकदा पाहाच

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

हे फोटो शेअर करत आर. माधवनने ‘मला न मिळालेले रोल. यातील कोणत्या रोलसाठी मी योग्य होतो आणि यातील कोणता रोल मला चांगला वाटला नसता?’ या आशयाचे कॅप्शन माधवनने दिले आहे.

सध्या आर माधवन ‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माधवन या चित्रपटावर काम करत होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून ते कथा लेखनापर्यंतची जबाबदारी स्वत: माधवनने घेतली आहे. आता या चित्रपटासाठी माधवनने शाहरुख खानला विचारले असल्याचे म्हटले जाते. चित्रपटात शाहरुख एका पत्रकाराची भूमीका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor rmadhavan share his photo chhatrapati shivaji maharaj look avb