बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या काही वर्षांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या प्रत्येक चित्रपटागणिक अभिनयात निपुण होत चालली आहे. लवकरच ती मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पुढच्या वर्षी जुलै महिन्यात प्रदर्शित होणारा हा चित्रपट ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित आहे.

पंजाब येथील मलेरकोटला शहरात सध्या ‘राझी’चे चित्रीकरण सुरू आहे. यात काश्मिरी मुलीची भूमिका साकारणारी आलिया डी-ग्लॅम लूकमध्ये दिसेल. याआधी ती ‘उडता पंजाब’मध्येही अशाच डी-ग्लॅम लूकमध्ये दिसली होती. दरम्यान, चित्रीकरणावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंजाबच्या रस्त्यांवर आलियाने नुकतीच काही दृश्ये चित्रित केली. सलवार आणि बुरखा घातलेली आलिया तिच्या भूमिकेत समरस झालेली दिसते.

धर्मा प्रोडक्शन आणि जंगली पिक्चर्सची निर्मिती असलेल्या ‘राझी’ चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसतील. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. आलिया यात भारतीय लष्कराला गुप्त माहिती पुरवणाऱ्या पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

https://www.instagram.com/p/BYvXQNxFN5k/

https://www.instagram.com/p/BYvRTLYhSYO/

https://www.instagram.com/p/BYusJvjh7o1/

https://www.instagram.com/p/BYwzli9gdW1/