टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. दिवाळीनिमित्त अंकिताने तिच्या मित्र-मैत्रिणी व बॉयफ्रेंड विकी जैनसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत अंकिता तिच्या बॉयफ्रेंडला ओरडताना दिसतेय.

अंकिता व विकीचा हा व्हिडीओ व्हूम्पला या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती विकी जैन आणि इतर मित्र-मैत्रिणींसोबत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. दिवाळी पार्टीत हसत-खेळत, मस्करी करत अंकिता शुभेच्छा देत असताना विकी जैन मागून एका शब्दाचा उच्चार करतो. त्यानंतर अंकिता त्याच्यावर ओरडते आणि त्याला सांगते की, “सोशल मीडियावर असं बोलायचं नसतं.” थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा अंकिता व विकी मिळून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.

Ishan Kishan and Tim David Wrestling Video viral
IPL 2024: इशान किशन आणि टीम डेव्हिडचं चाललंय तरी काय? सराव सोडून दोघात रंगला कुस्तीचा फड, VIDEO होतोय व्हायरल
bengaluru doctor slams smoker
“सिगारेट न पिणारे Losers…” तरुणीच्या पोस्टवर डॉक्टरांनी सुनावले खडेबोल; Post व्हायरल
A young man presents amazing lavani dance in front of teachers
VIDEO : गौतमी पाटील तरुणासमोर फेल! शिक्षकांसमोर सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ होतोय व्हायरल
Gulab jamun milkshake viral video
गुलाबजाम, साखरेचा पाक, आइस्क्रीम अन्… सोशल मीडिया व्हायरल होतोय ‘डायबिटिक मिल्क शेक’ पाहा हा Video
suhana khan break up
“मी ब्रेकअप केलंय,” शाहरुख खानच्या लेकीचं विधान; सुहाना खानचा ‘तो’ व्हिडीओ पाहिलात का?
ola electric scooter driving in sea viral
“भाऊपण ओला, स्कूटरपण Ola…” या ‘नेक्स्ट लेव्हल टेस्टिंग’चा Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
Dalbhaji In Vidarbha
विदर्भातील लोकप्रिय डाळभाजी कधी खाल्ली का? पंगतीत वाढली जाते, रेसिपीचा VIDEO एकदा पाहाच
pune old memorie
Pune : आठवणीतले पुणे! जुन्या PMT ने तुम्ही कधी प्रवास केला का? VIDEO व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

पाहा फोटो : बॉयफ्रेंड विकी जैनसोबत अंकिता लोखंडेची खास दिवाळी

अंकिताने दिवाळी सेलिब्रेशनचे अनेक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने विकी जैनसोबत काही रोमॅण्टिक फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता आता बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करतेय. अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘बागी ३’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.