बॉलीवूडसह मराठी मनोरंजसृष्टीतली लोकप्रिय जोडी म्हणजेच रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूझा. रितेश-जिनिलिया नेहमीच त्यांच्या मजेशीर रील्समुळे चर्चेत असतात. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही दोघं चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात.

रितेश-जिनिलिया नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ शेअर करीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या कपलनं नुकताच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत जिनिलियाने काळ्या रंगाचा मॅचिंग सेट परिधान केलाय; तर रितेशनं सफेद रंगाचं टी-शर्ट आणि त्यावर नारंगी टोपी घातली आहे.

हेही वाचा… “…अन् मला कॉम्प्रोमाईजसाठी विचारलं”, शर्मिष्ठा राऊतने सांगितला ‘तो’ वाईट अनुभव, म्हणाली…

व्हिडीओ सुरू होताच जिनिलिया रितेशला विचारते, “लग्नाच्या आधी तर तू अनेकदा आय लव्ह यू , आय लव्ह यू बोलायचास; आता का नाही बोलत.” त्यावर रितेश तिला म्हणतो, “निवडणूक संपली, प्रचार संपला.” व्हिडीओला कॅप्शन देत रितेशनं लिहिलं, “बेबी हीच आहे योग्य निवड; जा मतदान करा”

रितेश-जिनिलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “मग तर हे सरकार फक्त पाच वर्ष राहिलं” तर, दुसऱ्यानं लिहिलं, “विधानसभा प्रचार चालू होतोय”. एक युजर कमेंट करीत म्हणाला, “भावा, सावधान राहा. कारण- मतदान दर पाच वर्षांनी होतं. सरकार बदलू शकतं.” रितेश-जिनिलियाच्या व्हिडीओनुसार प्रचार आणि सरकारची उपमा देत नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… “तुमच्या भारत मातेला त्रास देऊ नका”, लोकसभा निवडणुकीदरम्यान सलमान खानने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

मजेशीर व्हिडीओ बाजूला ठेवला, तर रितेश-जिनिलियानं कुटुंबासमवेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. लातूर येथील बाभळगाव मतदान केंद्रावर जाऊन रितेश, जिनिलिया व रितेशची आई वैशाली देशमुख यांनी मतदान केलं. रितेशचे वडील व महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

हेही वाचा… ठरलं तर मग: अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला उरले शेवटचे फक्त ४८ तास; दोघं काय घेणार निर्णय? पाहा प्रोमो

दरम्यान, रितेश-जिनिलियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रितेश लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तर, जिनिलीया देशमुख लवकरच आमिर खानच्या सितारे जमीन पर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. लवकरच हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.