बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपासून देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई, कल्याण, ठाणेसह १३ मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. अनेक कलाकार आपला मतदानाचा हक्क बजावत मत देताना दिसत आहेत. सलमान खानदेखील २० मे रोजी त्याचा हक्क बजावून मत देणार आहे.

मतदानाच्या दिवशी अनेकजण निष्काळजीपणा करीत त्यांचे मत वाया घालवतात. अशा लोकांसाठी सलमानने त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात सलमान स्वत: देशाचा सुजाण नागरिक म्हणून मतदान करणार आहे, असे त्याने सांगितलेय. तसेच सगळ्यांनी मतदान करा, असे आवाहनही त्याने जनतेला केले आहे.

This Bollywood actor ran away from home because his father beat him to the death
वडिलांनी कायमचं मारून टाकण्याच्या आधीच आईने दिला पळून जाण्याचा सल्ला, ‘या’ अभिनेत्याने सांगितला आयुष्यातला तो कठीण प्रसंग
Shatrughan Sinha Reaction On Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding
“ती माझी एकुलती एक मुलगी आहे अन्…”, सोनाक्षी-झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले?
karan johar moves to high court against shaadi ke director karan aur johar movie illegal use of his name in their film
“माझ्या नावाचा गैरवापर…”, करण जोहरची न्यायालयात धाव, ‘या’ चित्रपटाच्या शीषर्कावर बंदी घालण्याची मागणी
salman khan told cops that he woke up to gunshot about firing at home
“झोपेत असताना गोळीबाराचा आवाज आला अन्…”, सलमान खानने पहिल्यांदाच पोलिसांना सांगितला ‘त्या’ दिवशीचा घटनाक्रम
Amitabh Bachchan Jaya Bachchan fought like kids
“ते लहान मुलांसारखे भांडायचे,” जया अन् अमिताभ बच्चन डेटवर ‘या’ अभिनेत्रीला न्यायचे सोबत; म्हणाल्या, “त्यांची भांडणं…”
Kangana Ranaut says film industry work is easy
चित्रपटांमध्ये काम करणं राजकारणापेक्षा सोपं, खासदार कंगना रणौत यांचं विधान; म्हणाल्या, “मला इतका त्रास…”
Sonakshi Sinha Zaheer Iqbal wedding Invitation
“अफवा खऱ्या आहेत”! सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाची पत्रिका चर्चेत; जाणून घ्या ड्रेस कोड, वेळ अन् ठिकाण
Munjya box office collection day 6
‘मुंज्या’ने ६ दिवसांत वसूल केली बजेटची रक्कम, चित्रपटाची एकूण कमाई किती? जाणून घ्या
Bollywood singer Palak Muchhal saves 3000 lives with fundraiser
Video: कौतुकास्पद! प्रसिद्ध गायिकेनं ३००० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

सलमान खानने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर मतदानाविषयक एक पोस्ट शेअर केलीय या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमानने या पोस्टमध्ये लिहिले, “काहीही झालं तरी मी वर्षाचे ३६५ दिवस व्यायाम करतो आणि आता काहीही झालं तरी २० तारखेला मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्हाला जे काही करायचंय ते करा; पण आधी जा आणि मतदान करा. तुमच्या भारतमातेला त्रास देऊ नका. भारतमाता की जय.”

मतदान करणं हा सगळ्यांचा हक्क आहे आणि तो सामान्य नागरिकांपासून ते कलाकार बजावताना दिसत आहेत. तरीही असे काही लोक असतात; जे मतदान करण्यापासून लांब राहतात. पुढच्या पाच वर्षांचा विकास हा आपल्या एका मतावर अवलंबून असतो. म्हणून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कलाकारांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करीत मतदान कराच, असं सलमाननं बजावून सांगितलं आहे.

हेही वाचा… VIDEO: “वेडी, मंदिरात असे कपडे…”, देवदर्शनासाठी निघालेल्या अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

दरम्यान, सलमान खानच्या कामाबाबत सांगायचं झालं, तर सलमानचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात साऊथ स्टार रश्मिका मंदाना सलमानबरोबर पहिल्यांदा झळकणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास व सलमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

हेही वाचा… राखी सावंतच्या आजारपणावर आदिल खानचा संशय; म्हणाला, “कोर्टाची तारीख जवळ येतेय म्हणून…”

‘सिकंदर’च्या शूटिंगची सुरुवात मे महिन्यात सुरू होणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण भारत आणि युरोपमध्ये होणार आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल जरी अजूनही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अंदाजे या चित्रपटाचं बजेट ४०० कोटी इतकं असल्याचं बोललं जातंय. चाहते सलमान खान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.