‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या अगदी पहिल्या पोस्टरपासून ते काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरपर्यंत चित्रपटाशी निगडीत प्रत्येक गोष्टीने अनेकांचेच लक्ष वेधले. या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वाधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यामागोमाग आता एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली- द कन्क्लूजन’ या चित्रपटाच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. भारतात जवळपास ६५०० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटर अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती देत सर्वांनाच थक्क केले आहे.

इतर कोणत्याही चित्रपटाच्या तुलनेत बाहुबली २ या चित्रपटाला आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग मिळणार असल्याचे त्यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. याआधी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे आणि सॅटेलाइट हक्क विकले गेल्यामुळे चित्रपटाने विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या पातळीवर प्रदर्शित होणारा हा चित्रपट कमाईचे कोणते नवे विक्रम आखणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Rohit Sharma Batting Loophole
“रोहित शर्मा बाद होण्याचा ‘हा’ पॅटर्न झालाय, तिथे शाहीन आफ्रिदी..”, विश्वचषकाआधी कर्णधाराला वासिम जाफरचा सल्ला
Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य

‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेले यश पाहता त्याविषयी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना या ट्रेलरच्या संकलकांनी म्हणजेच वामसी अतलुरी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. ‘चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेले यश पाहून आम्ही भारावलो आहोत. हे यश अनपेक्षित होतं. देशातील आजवरच्या सर्वात महागड्या चित्रपटाच्या संकलनाचा कोणताही ताण आमच्यावर नव्हता. याउलट ट्रेलर पाहून प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्याचे दडपण आमच्यावर होते.’ असे अतलुरी म्हणाले.

अभिनेता प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी बाहुबलीचा म्हणजेच अभिनेता प्रभासला मराठमोळ्या अभिनेत्याने आवाज दिला आहे. बाहुबलीचा हिंदीतील आवाज आहे, अभिनेता शरद केळकर. त्यामुळे सर्वार्थाने हा चित्रपट सर्वांसाठीच एक पर्वणी असणार आहे यात शंकाच नाही.