मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, तसेच निर्माती क्रांती रेडकर अनेकदा चर्चेत असते. क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. तिच्या दोन्ही मुलींचे व्हिडीओ ती अनेकदा शेअर करीत असते. पण, यावेळी क्रांतीने एका ट्रेंडिंग गाण्यावर मजेशीर रील शेअर केली आहे. क्रांतीचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

क्रांती रेडकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘चमकीला’ चित्रपटातील व्हायरल गाण्यावर एक रील शेअर केली आहे आहे. ‘चमकीला’ चित्रपट १२ एप्रिल २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Savitribai Khanolkar Marathi name for designing the Param Vir Chakra award
सावित्रीबाई खानोलकर… परमवीर चक्र पुरस्काराचं डिझाईन करणारं मराठमोळं नाव
pope francis news today
“देवावर हसणं म्हणजे निंदा नाही, पण विनोद…” पोप फ्रान्सिस विनोदी कलाकारांना काय म्हणाले?
MP Chirag Paswan Leaked Video
कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या लीक क्लिपमुळे खळबळ, मोदींवरही होतेय टीका! Video मध्ये काय व कधी घडलं?
Nagpur, Nagpur Love Triangle case, dispute in love, Friends Clash Leading to Brutal Murder, murder in Nagpur, murder news, Nagpur news,
प्रेयसीला मित्राने केला प्रपोज, युवक संतापला अन् नंतर जे घडलं ते…
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”
Kisan Kathore, Bhiwandi,
भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या विजयापेक्षा किसन कथोरेंचीच चर्चा अधिक
Photographs of ordinary American citizens waving the flag upside down to show their support for donald Trump have been released
ट्रम्प समर्थक अमेरिकेत फडकवतात उलटे झेंडे… या आंदोलनास केव्हा सुरुवात झाली? त्यामागील इतिहास काय?
Pimpri, Ex-boyfriend,
पिंपरी : प्रेयसीला भेटायला आलेल्या एक्स बॉयफ्रेंडला प्रियकराने कारने उडवले; बॉयफ्रेंड गंभीर जखमी

हेही वाचा… “…पण मला याचं वाईट वाटलं”, नामांंकित कॉमेडी शोमध्ये केली करण जोहरची नक्कल; म्हणाला…

‘चमकीला’ चित्रपटातील अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. पण ‘पेहेले ललकारे नाल’ हे पंजाबी गाणं सध्या तुफान व्हायरल होतंय आणि ते ट्रेंडिंगदेखील आहे. अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्सनी या गाण्यावर व्हिडीओ बनवून, सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता क्रांती रेडकरने या व्हायरल गाण्यावर रील शेअर केली आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिनं लिहिलं, ‘महाराष्ट्रीयन्स चमकीला चित्रपटातील गाणं गाताना’

क्रांतीनं या गाण्यातल्या पहिल्या दोन ओळी नीट गायल्या आहेत; पण पुढच्या ओळी गाताना क्रांती अडखळताना दिसतेय. क्रांतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर अनेक कलाकार, चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता ऋषी सक्सेनानं कमेंट करीत लिहिलं, “तू एकटीच अशी नाही आहेस. आम्हीसुद्धा असंच गातो.” तर सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदेनं कमेंट करीत लिहिलं, “माझ्या आईचंदेखील हे गाणं आवडत आहे.”

हेही वाचा… “…ते माझं पहिल प्रेम आहे”, ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईकचं विधान; म्हणाली…

“मी तर दुसऱ्याच ओळीत गुणगुणायला लागते”, असं एका चाहतीनं कमेंट करीत लिहिलं. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “मॅम, मी तुमचे व्हिडीओ १०-२० वेळा बघतो आणि मला हसू अनावर होतं.” “तू का इतकी भारी आहे यार! अगदी परफेक्ट नक्कल केलीयस. खूप हसले” अशी कमेंट एकीने केली.

हेही वाचा… “माझ्या आईने त्याला खूप झापलं होतं”, ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ फेम रोहित राऊतला ओरडली होती जुईलीची आई; गायकाने सांगितला सासूबाईंचा किस्सा

दरम्यान, क्रांती रेडकरच्या कामाबाबत सांगायचं झालं, तर क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हितेन पटेल, ऋषी सक्सेना, ऊर्मिला कोठारे, प्रसाद ओक, अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.