बॉलिवूडमधील काही बहुचर्चित जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांच्या वयामध्ये बरंच अंतर असतानाही लग्नबंधनात अडकत दोघांचाही संसार अनेक वर्षे टिकला. पण, त्यानंतर मात्र काही कारणास्तव आपल्या वाटा वेगळ्या करत दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. सैफ-अमृताच्या घटस्फोटाविषयी अनेक प्रश्नांचा मारा त्यांच्यावर झाला. पण, त्या दोघांनीही यावर मौन बाळगण्यास प्राधान्य दिलं. सध्या त्यांचं नातं पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलंय ते म्हणजे, सैफच्या एका जुन्या मुलाखतीमुळे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या सर्व मुलाखतीमध्ये सैफने आजवर काही मर्यादा पाळल्या आहेत. तसंच तो नेहमीच माध्यमांशी बोलताना आपली भाषा जपून वापरतो. त्यामुळे त्याच्या कोणत्याही मुलाखतीतील वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

२००५ मध्ये त्याने ‘टेलिग्राफ’ला दिलेली एक मुलाखत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. या मुलाखतीत त्याने अमृता आणि त्याच्या नात्यात आलेल्या दुराव्याच्या मुद्द्याला अधोरेखित केलं होतं. अमृतासोबच्या नात्याविषयी सांगताना सैफ म्हणाला, ‘मी अमृताला पाच कोटी रुपये देणं अपेक्षित होतं. त्यापैकी मी तिला २.५ कोटी रुपये दिलेसुद्धा. त्याशिवाय, मुलं १८ वर्षांची होईपर्यंत मी तिला दरमहा १ लाख रुपये दिले.’ अर्थात ही मुलाखत २००५ सालची असल्यामुळे त्यावेळी सैफच्या नावाला फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्याच आधारे तो म्हणाला होता, ‘मी काही शाहरुख खान नाही. माझ्याकडे तितका पैसाही नाही. ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे देईन असं आश्वासन मी तिला दिलं होतं. आतापर्यंत जाहिराती, स्टेज शो करुन माझ्याकडे जे काही पैसे जमले होते. ते मी माझ्या मुलांसाठी देऊ केले आहेत.’

treadmill
VIDEO : बाप आहे की हैवान? फिटनेसच्या हव्यासाने घेतला पोटच्या मुलाचा जीव, ट्रेडमिल मशिनवर पळवलं अन्…
chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!

सैफच्या त्या मुलाखतीत त्याने बऱ्याच गोष्टींवरुन पडदा उचलला होता. त्यावेळी आपल्याला ‘सतत निरर्थक असल्याची, काहीही किंमत नसल्याची जाणिवही तिने करुन दिली’, असं म्हणत सैफकडे अनेकांचच लक्ष वेधलं. ‘आपण किती निरर्थक आहोत हे तेव्हा मला कळलं. सतत आपल्या आई आणि बहिणीला उद्देशून केले जाणारे टोमणे, त्रास, अपमान आणि अत्याचार हे सहन करत त्या परिस्थितीलाही मी सामोरं गेलो होतो’, असं सैफ म्हणाला. यावेळी तो रोझा नावाच्या त्याच्या प्रेयसीच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याला रोझाविषयीही काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सैफ म्हणाला होता, ‘ती (रोझा) अमृताप्रमाणे चित्रपटसृष्टीशी संलग्न नाही. अमृताने माझ्या चित्रपट कारकिर्दीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण, रोझाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहणं ही एक चांगलीच बाब आहे. ज्याप्रमाणे शाहरुखची पत्नी गौरीही त्याच्या कामामध्ये दखल देत नाही.. हे तसंच काहीसं आहे.’ अर्थात रोझाबद्दलचं सैफचं हे मत काही वर्षांनी बदललं हे तर आपण सर्वच जाणतो.

वाचा: सैफची मुलगी म्हणते, किस करण्यात गैर काय?

सध्याच्या घडीला सैफ- अमृता त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. सैफने अभिनेत्री करिना कपूरशी लग्न केलं असून काही दिवसांपूर्वीच त्यांच्या जीवनात ‘तैमुर’ या त्यांच्या मुलाचंही आगमन झालं आहे. तर, अमृतासुद्धा सध्या तिच्या मुलांच्या संगोपनावर आणि बॉलिवूड पदार्पणावर जास्त लक्ष देत आहे.

वाचा: मुस्लिम असल्याचे कोणाला सांगू नकोस; पॅरिसमध्ये सैफला सल्ला