अरुणा इराणी या बॉलीवूडमधील एकेकाळच्या दिग्गज अभिनेत्री आहेत. आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अरुणा यांनी ‘बेटा’, ‘फर्ज’, ‘रॉकी’, ‘बॉबी’ व ‘लव्ह स्टोरी’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ६० वर्षांहून अधिक काळापासून सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या अरुणा यांनी आजवर ५०० हून जास्त चित्रपट केले आहेत. नासिर हुसैन यांच्या ‘कारवां’ चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुणा आपल्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. सर्वाधिक चर्चा झाली ती अरुणा व दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या लग्नाची. त्यांनी आपलं लग्न खूप दिवस सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. याशिवाय अभिनेत्रीने कधीही आई न होण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत अरुणा यांनी लग्न जगापासून लपवून ठेवण्याबद्दल व मूल न होऊ देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती.

“मी पहिल्यांदाच एका महाराष्ट्रीय तरुणाची…”, मालिकेसाठी मराठी शिकतोय हिंदी अभिनेता; भाषेबद्दल म्हणाला…

विवाहित पुरुषाशी लग्न करण्याबाबत अरुणांची प्रतिक्रिया

“मी एका विवाहित पुरुषाशी लग्न केलं आहे आणि ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी आजाराने निधन झाले होते. आता मी पहिल्यांदाच या विषयावर कोणाशीतरी बोलत आहे,” असं अरुणा इराणी ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आपल्या आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य

अरुणा पुढे म्हणाल्या, “मला माझ्या पतीच्या पहिल्या लग्नाबद्दल माहित नव्हतं, ही बातमी का पसरवली गेली याची मला कल्पना नाही. त्यांची पत्नी मुलांसह सेटवर यायची. लग्न करण्याचा निर्णय आम्हा दोघांसाठी खूप कठीण होता. बायका, नेहमी पतीच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या महिलांना शिव्या घालतात. पण तुझ्या आनंदाला मी जबाबदार नाही, तो तुझा नवरा आहे. आधी त्याला थांबव, त्याने असं का केलं ते विचार. मी तुमचं घर तोडायला अफेअर थोडीच केलं. तिसरी व्यक्ती त्यांच्या नात्यात कशी येऊ शकते हे फक्त त्या नवरा किंवा बायकोलाच माहित.”

मेचा शेवटचा आठवडा असणार धमाकेदार, OTT वर येतायत जबरदस्त वेब सीरिज अन् चित्रपट, वाचा यादी!

मूल न होऊ देण्याच्या निर्णयाबद्दल अरुणा इराणींचं मत

मूल न होऊ देण्याच्या निर्णयाबद्दल अरुणा म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी लग्न करणं सोपं नाही. याच कारणामुळे मी आई झाले नाही. कारण जे मी सहन करतेय ते फक्त मीच सहन करू शकते. मी काळजीत, चिंतेत असते ते ठीक आहे, पण माझ्या मुलाने ‘पप्पा कुठे आहे?’ असं विचारलं तर मी त्याला काय उत्तर देऊ? तो (कुकू कोहली) अडकेल. समजा माझ्या मुलाला मध्यरात्री काही झालं तर मी त्याला कॉलही करू शकत नाही. म्हणूनच मला मूल असावं असं कधीच वाटलं नाही. जे मी सहन केलंय ते दुःख मी माझ्या बाळाला होऊ देणार नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress aruna irani reacts on not having baby and marrying married kuku kohli hrc
First published on: 27-05-2024 at 12:07 IST