ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट व वेब सीरीज पाहण्याची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ असते. दर आठवड्याला ओटीटीवर नवनवीन कलाकृती येत असतात. या आठवड्यात वीकेंडला नाही तर सुरुवातीलाच काही चित्रपट व वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत, ज्याची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते. २८ तारखेला काही धमाकेदार चित्रपट व वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट व वेब सीरिजची क्रेझ अशी असते की एकदा तुम्ही बघायला सुरुवात केली की ते अर्धवट सोडू वाटत नाही. २८ मे रोजी नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि झी ५ सह इतर काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. तुम्हाला कॉमेडीसोबतच ॲक्शनचाही पूर्ण डोस मिळेल. जाणून घ्या कलाकृतींची यादी…

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

पंचायत ३

‘पंचायत’च्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार असून या सीरिजचा नवा सीझन २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. फुलेरा गावाची कथा, सरपंच, सचिव आणि बनराकस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी मंजू देवी निवडणूक लढवणार असून त्यांना बनाराकसकडून टक्कर मिळणार आहे. दुसरीकडे नवीन सचिव आल्याने जुन्या सचिवासाठी अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. तुम्ही ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

स्वातंत्र्य वीर सावरकर

रणदीप हुड्डा यांचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

इल्लीगल ३

‘इल्लीगल’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन २९ मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. नेहा शर्मा, पियुष मिश्रा, अक्षय ओबेरॉय, नील भूपलम आणि सत्यदीप मिश्रा यांच्याशिवाय यात अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. या सीरिजचा प्रीमियर २९ मे रोजी जिओ सिनेमावर होणार आहे. या सीरिजचे पहिले दोन सीझन हिट झाले होते.

एटलस

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझचा अमेरिकन सायन्स फिक्शन ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘एटलस’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. ब्रॅड पेटन दिग्दर्शित या चित्रपटात जेनिफर व्यतिरिक्त सिमू लिऊ, स्टर्लिंग के. ब्राउन, ग्रेगरी जेम्स कोहान, अब्राहम पॉप्युला, लाना पॅरिला आणि मार्क स्ट्राँग यांच्या भूमिका आहेत.

“ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाहीत”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, “तुम्ही असले चाळे…”

रत्नम

तामिळ अभिनेता विशाल स्टारर चित्रपट ‘रत्नम’ आता प्राइम व्हिडीओवर प्रसारित होत आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन हरी यांनी केले आहे. यात प्रिया भवानी शंकर, समुथिरकणी, गौतम वासुदेव मेनन, योगी बाबू, मुरली शर्मा, हरीश पेराडी, मोहन रमण आणि विजयकुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

डाय हार्ट २

हा एक कॉमेडी ॲक्शन चित्रपट आहे, यात केविन हार्ट, नताली एम्युनल आणि जॉन सीना सारख्या हॉलीवूड स्टार्सच्या भूमिका आहेत. हा चित्रपट क्लासिक ‘डाय हार्ट’ मालिकेचा पॅरोडी शो आहे, यात केविन हार्टचा प्रवास दाखविण्यात आला आहे. ३० मे रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

द गोट लाइफ

हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे, जो २६ मे रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.